शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यात दोन शासकीय कृषी महाविद्यालये ? ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार हळगावचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 20:15 IST

शासनाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने श्रीगोंदा व जामखेड तालुक्यांत कृषी महाविद्यालय सुरू करण्यास अनुकूलता दर्शविल्याचे समजते. त्याआधारे दोन्ही कृषी महाविद्यालयांना मंगळवारी होणा-या मंंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

अहमदनगर : शासनाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने श्रीगोंदा व जामखेड तालुक्यांत कृषी महाविद्यालय सुरू करण्यास अनुकूलता दर्शविल्याचे समजते. त्याआधारे दोन्ही कृषी महाविद्यालयांना मंगळवारी होणा-या मंंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दक्षिण नगर जिल्ह्यात एकाच वेळी दोन महाविद्यालयांना मंजूरी देऊन स्वपक्षातील वाद मिटविण्याबरोबरच दक्षिणेतील नेत्यांना बळ देण्याचे नवे धोरण सरकार राबवित असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आहे.शेती व्यवसायाची अलीकडच्या काळात कमालीची वाताहात झाली़ कधी नव्हे ते नगर जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू झाले़ विशेष म्हणजे जिल्ह्यात स्वतंत्र कृषी विद्यापीठ आहे. त्याचा जिल्ह्यातील किती शेतक-यांना फायदा झाला, हा संशोधनाचा विषय आहे़ ते कमी म्हणून काय जिल्ह्यात नव्याने दोन कृषी विज्ञान केंद्रे आली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या बाभळेश्वर येथे तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या दहिगाव-ने येथे नव्याने कृषी विज्ञान केंद्र सुरू झाले. केंद्रात व राज्यात आघाडीची सत्ता असल्याने ही केंद्र जिल्ह्यातील आघाडीच्या लोकप्रतिनिधींनी घेतली. दोन्ही केंद्र उत्तर नगर जिल्ह्यात सुरू झाली. दक्षिण नगर जिल्हा तसा दुष्काळी़ परंतु, या भागातील शेतक-यांना बळ देणारी एकही मातृसंस्था उभी राहिली नाही. दक्षिण नगर जिल्ह्याने जिल्ह्याला दोन पालकमंत्री दिले. ते दोन्ही सध्या भाजपात आहेत. माजी पालकमंत्री बबनराव पाचपुते जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत. त्यावेळी राष्ट्रवादीत असलेले पाचपुते सध्या भाजपात आहेत. पालकमंत्री राम शिंदे हे मूळ भाजपाचेच आहेत. जिल्हा तिथे कृषी महाविद्यालय हे सरकारचे धोरण जाहीर होताच शिंदे यांनी त्यांच्या जामखेड तालुक्यातील हळगावाला कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. परंतु, शिंदे यांचा हा प्रस्ताव पाचपुतेंच्या चांगलाच जिव्हारी लागला़ त्यांनी थेट महाविद्यालयावरच दावा ठोकला. वाद अखेर न्यायालयात गेला. न्यायालयाने तज्ज्ञ समिती नियुक्तीचा आदेश दिला. या समितीने दोन्ही तालुक्यांतील वस्तुस्थितीचा अहवाल सादर केला असून, दोन्ही ठिकाणी महाविद्यालय सुरू करण्यास हारकत नसल्याचे सरकारला कळविले आहे. पण, एका जिल्ह्यात एकच कृषी महाविद्यालय, असे सरकारचे धोरण आहे. मात्र स्वपक्षातील दोन्ही नेते महाविद्यालयांसाठी इरेला पेटल्याने सरकारकडून दोन्ही महाविद्यालयांना मंजुरी देण्याच्या जोरदार हालचाली सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर