शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन पिढ्या गुहेत राहणा-यांना मिळाले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 12:18 IST

अकोले तालुक्यातील अत्यंत दुर्गम आदिवासी फोपसंडी गावातील सोमनाथ घामाजी वळे यांनी चक्क दुसºया पिढीत घर पाहिले. गेल्या दोन पिढ्या वळे कुटुंब डोंगर कपारीत असलेल्या गुहेत आपले जीवन जगत होते. प्रधानमंत्री आवास योजनेतून त्यांना घर देण्यात आले असून नव्या घरात त्यांची दिवाळी साजरी होणार आहे.

मच्छिंद्र देशमुख । अकोले : अकोले तालुक्यातील अत्यंत दुर्गम आदिवासी फोपसंडी गावातील सोमनाथ घामाजी वळे यांनी चक्क दुस-या पिढीत घर पाहिले. गेल्या दोन पिढ्या वळे कुटुंब डोंगर कपारीत असलेल्या गुहेत आपले जीवन जगत होते. प्रधानमंत्री आवास योजनेतून त्यांना घर देण्यात आले असून नव्या घरात त्यांची दिवाळी साजरी होणार आहे.घर देता का कुणी घर?  ही म्हण कधी कधी प्रत्यक्ष अनुभवायलाही मिळते. अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी फोपसंडी या गावात सोमनाथ घमाजी वळे (वय ६०) हे गावाच्या उत्तरेला सहाशे फूट उंच डोंगरावर एका गुहेत राहतात. त्यांचे वडील व आजोबा देखील याच गुहेत राहत होते. गायी पाळणे, कंदमुळे व जंगलातील मध, डिंक, वनौषधी विकून हे कुटुंब जगत आहे. ब्रिटिशकाळात जंगल कायदा आला व अभयारण्य क्षेत्रात हे गाव आले. वळे कुटुंब ज्या गुहेत राहत होते, गुरे चारत होते ते जंगल अभयारण्यात गेले. त्यामुळे त्यांच्या नावावर जमीन होऊ शकली नाही. त्यामुळे घर बांधायला जागाच राहिली नाही. केवळ अभयारण्यात गायी चारायच्या. वनसंपदेतील घटक विकून पोट भरायचे, एवढेच काम, शिक्षण, वीज, घर, टिव्ही या त्यांच्या स्वप्नांतीलच गोष्टी.  घर काय असते हे त्यांनी कधी पाहिलेच नाही. सरकारी घर मिळाल्याचा आनंदआम्ही दोन पिढ्या गडदीत (गुहेत) राहिलो. सरकारी घर मिळाल्याचा खूप आनंद झाला. मुलाचे शिक्षण करता आले नाही. मात्र नातू पंकज चार वर्षाचा झाला आहे. तो आता शाळेत जाईल. आमची पिढी जंगलातून गावात आली. आता टी. व्ही., लाईट पहायला मिळणार, याचा आनंद आहे, असे फोफसंडी येथील लाभार्थी कुसूम वळे यांनी सांगितले.योजना पूर्तीचा आनंद    अकोले तालुक्यात २०१८ -१९ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १८४५, रमाई १६५, शबरी २२५ घरकुल पूर्ण झाली. किमान ८५ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले. पुढील १९ - २० मध्ये प्रधानमंत्री १४००, रमाई १७५ तर शबरीची सहाशे घरकुले मंजूर आहेत. उद्दिष्ट पूर्तीचा प्रयत्न आहे. वळे कुटुंब हे कित्येक वर्षे कपारीत राहत होते. स्वत: लक्ष घालून ग्रामसेवक व लाभार्थी यांना किचकट अटी तातडीने पूर्ण करण्यासाठी मदत केली. त्यांचे घरकुल पुर्ण झाले. योजना पूर्तीचा आनंद झाला, असे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी सांगितले. ‘लोकमत’ने टाकला होता प्रकाशझोत तीन वर्षांपूर्वी ‘लोकमत’ने वळे कुटुंबावर प्रकाशझोत टाकला. त्यानंतर सरकारी यंत्रणा तातडीने गुहेत दाखल झाली होती.  जागा, कागदपत्रे यांची मोठी अडचण होती. अकोलेचे गट विकास अधिकारी भास्कर रेंगडे थेट त्या गुहेत गेले. ग्र्रामसेवक अविनाश मंडलिक यांना आदेश देत कागदी सोपस्कार पूर्ण केले. त्यानंतर २०१८ - १९ या वर्षातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत वळे यांना घर मंजूर झाले. गावठ्यातील एक मोकळी जागा पाहून तेथे टुमदार घर उभे राहिले आहे. वळे कुटुंबाला शंभर वर्षांनी घर काय असते हे पहायला मिळणार आहे. या दिवाळीत वळे कुटुंबीयांचा गृहप्रवेश होणार आहे, असे कुसूम वळे यांनी सांगितले. 

टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनAhmednagarअहमदनगर