शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीचे काम करताना ढिगाऱ्याखाली दोघांचा मृत्यू; सारोळाबद्धी येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 22:22 IST

दोघे मृत कामगार आष्टी तालुक्यातील

लोकमत न्यूज नेटवर्कचिचोंडी पाटील (जि. अहमदनगर) : विहीर खोदण्याचे काम करणाऱ्या दोघांच्या अंगावर खडक, मातीचा ढिगारा कोसळून मृत्यू झाल्याची घटना सारोळाबद्धी (ता. नगर) शिवारात रविवारी (दि. १७) दुपारी घडली. मृत दोन्ही कामगार आष्टी तालुक्यातील लोणी सय्यदमीर येथील रहिवासी आहेत.

प्रल्हाद रोहिदास रक्ताटे (वय २८) व विलास शिवाजी वाळके (वय ४०, रा. लोणी सय्यदमीर, ता. आष्टी) अशी मृत कामगारांची नावे आहेत. याबाबत नगर तालुका पोलिसांनी सोमवारी माध्यमांना माहिती दिली. ती अशी की, सारोळाबद्धी शिवारातील बोरुडे या शेतकऱ्याच्या विहिरीच्या खोदाईचे काम सुरू होते. यासाठी ब्लास्टिंग करण्यात येणार होते. ब्लास्टिंगची स्फोटके ठेवण्यासाठी खडकाला ड्रिल मशिनच्या साहाय्याने छिद्र पाडण्याचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक खडक व मातीचा ढिगारा कोसळला. या ढिगाऱ्याखाली विहिरीचे काम करणारे दोन कामगार गाडले गेले.

या घटनेनंतर इतर कामगार व स्थानिक नागरिकांनी त्यांना बाहेर काढून उपचारासाठी नगरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.कामगारांचा मृत्यू स्फोटामुळे? या दोन्ही कामगारांचा मृत्यू ढिगारा कोसळून नव्हे तर जिलेटीन कांड्यांच्या स्फोटात झाला असून त्याला ठेकेदाराचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. खडकाला ड्रिलने छिद्र पाडून झाल्यानंतर काही छिद्रात जिलेटिनच्या कांड्या टाकण्यात आल्या होत्या. परंतु याची माहिती त्या दोन कामगारांना दिली नाही. हे कामगार पुन्हा ड्रिल मारण्यासाठी विहिरीत उतरले. त्यांनी ड्रिल सुरू केले व त्याच्या हादऱ्याने जिलेटीनचा स्फोट होऊन दोघांचा मृत्यू झाला. ठेकेदारासह पोकलॅनमालकाने हे प्रकरण दाबण्याच्या अनुषंगाने चुकीची माहिती पोलिसांना दिली व चुकीचा पंचनामा केला. त्यामुळे यास ठेकेदारांसह इतर जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. सध्या ठेकेदारासह इतर साथीदार फरार आहेत.