शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांपूर्वी विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद, 22 मिनिटांचं रेस्क्यू ऑपरेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 15:44 IST

भोसे शिवारातील अंकुश रंगनाथ क्षीरसागर यांच्या शेतातील विहीरात दोन दिवसापुर्वी नर जातीचा एक बिबट्या पडला

श्रीगोंदा /कर्जत (जि.अहमदनगर) : श्रीगोंदा कर्जत तालुक्याच्या सीमा रेषेवरील भोसे शिवारातील एका विहीरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या टीमने पिंजरा लावून जेरबंद केले. मंगळवारी २२ मिनिटांच्या रेस्क्यु ऑपेरेशननंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बिबट्या जेरबंद करण्यात यश आले. 

भोसे शिवारातील अंकुश रंगनाथ क्षीरसागर यांच्या शेतातील विहीरात दोन दिवसापुर्वी नर जातीचा एक बिबट्या पडला आणि मंगळवारी सकाळी अंकुश क्षीरसागर हे विहीरीवर गेले असता  बिबट्याने विहीरातुन डरकाळी फोडली. अंकुश क्षीरसागर यांनी बिबट्याला पाहिले. मिरजगावचे वनपाल रवी तुपे यांना कल्पना दिली. तुपे यांनी पाहणी करुन वरिष्ठांना कल्पना दिली.

वन परिक्षेत्र अधिकारी (पुणे) येथील वन्य जीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक कल्याण साबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव माकडे वन्य जीव परिक्षेत्र विवेक नातू यांनी शिरुर येथील वन्य जीव विभागाची आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. श्रीगोंदा कर्जत जामखेड वन विभागाचे कर्मचारी यांनी विहिरीतील बिबट्या काढण्यासाठी पिंजरा आत सोडला आणि २२ मिनिटात बिबट्या पिंजऱ्यात आडकला.

बिबट्या पार्कमध्ये बिबट्याचे वजन सुमारे १०० किलो असुन या बिबट्याची रवानगी बंदोबस्तात माणिकडोह येथील बिबट सफारी पार्क मध्ये करण्यात आली आहे.

मुक्त बिबटे पकडणार नाही श्रीगोंदा कर्जत तालुक्यात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. पाणी अन्न शोधार्थ बिबट्यांनी या भागाकडे धाव घेतली आहे. शेतकरी रान डुकरांच्या उपद्रवाने त्रस्त आहे रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी बिबट्या शिवाय पर्याय नाही. त्यामुळे या भागात शेतात अगर आडोशाला असलेले बिबटे पकडले जाणार नाहीत. विहीरात अगर घरात गोठ्यात बिबट्या घुसला तरच बिबट्या पकडला जाणार आहे.-कल्याणराव साबळे सहायक वनसंरक्षक वन्य जीव, पुणे  

टॅग्स :leopardबिबट्याAhmednagarअहमदनगरforest departmentवनविभाग