शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मुळा धरणावरील दोन बंधारे फुटले; नदीपात्रात विसर्ग वाढविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 17:03 IST

मुळा धरणावर असलेले दोन बंधारे अचानक फुटले आहेत. त्यामुळे मुळा धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग २००० क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला आहे.

राहुरी : मुळा धरणावर असलेले दोन बंधारे अचानक फुटले आहेत. त्यामुळे मुळा धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग २००० क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला आहे़. मंगळवारी सकाळपर्यंत नदीपात्रातील विसर्ग कमी होईल, अशी माहिती मुळा पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़. भागडा चारीचे आवर्तन पूर्ववत सुरू करण्यात आले आहे़.मुळा धरणात असलेल्या २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठा कायम ठेऊन नदीपात्रात आवर्तन सोडले जाते़. धरणावर असलेले जिल्हा परिषदेचे दोन बंधारे अचानक फुटले़. याशिवाय धरणावर रिमझीम पावसाने हजेरी लावली़. पर्यायाने पाटबंधारे खात्याने नदीपात्रातील आवर्तन सुरूवातीला १००० क्युसेकवरून १ हजार ५०० क्युसेकपर्यंत केले़. त्यानंतर पाण्याची पातळी स्थीर ठेवण्यासाठी २००० क्युसेकपर्यंत नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे खात्याने घेतला आहे़.मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने हजेरी लावली आहे़. लाभक्षेत्रावर पाऊस पडत असल्याने तीन दिवसांपूर्वी शेतक-यांच्या मागणीनुसार उजवा कालवा बंद करण्यात आला होता़. याशिवाय डावा कालवाही बंद होता़. भागडा चारीचे एक्सप्रेस फिडर बिघडल्याने आवर्तन बंद होते़. फिडर सुरू झाल्याने पुन्हा भागडा चारीतून ५० क्युसेकने पाण्याचे आवर्तन सुरू झाले असल्याची माहिती भागडा चारीचे अभियंता विकास गायकवाड यांनी दिली़.     मुळा धरणात पाण्याची पातळी १८१२ फूट इतकी आहे़. धरण १०० टक्के भरले आहे. आतापर्यंत कोतूळ येथे तब्बल ११७० मिमी पावसाची नोंद झाली आहे़. मुळानगर येथे आतापर्यत ६३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे़. कोतुळ येथून पाण्याची ७०० क्युसेकने आवक सुरू आहे़.

टॅग्स :Rahuriराहुरीwater shortageपाणीकपात