घरासमोर बांधलेल्या पाळीव गायांवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्याने गायींनी मोठा आवाज केला. अचानक झालेल्या हल्ल्याने घरातील महिलांनी मोठा आवाज केला. घराकडे झालेला मोठा आवाज ऐकून शाळेजवळ शेकत असलेले मच्छिंद्र दुधावडे हे घराकडे आले. त्यांना बिबट्याने गायींवर हल्ला केल्याचे दिसले. आरडाओरडा करून त्यांनी बिबट्याला पळवून लावले. या दरम्यान, घरातून बॅटरी घेऊन उजेडात बिबट्या कुठे दिसतो काय हे पाहत असताना बिबट्याने मागे फिरून दुधावडे यांच्यावर हल्ला केला. प्रसंगावधान राखत त्यांनी हात पुढे करून छातीवर होणारा हल्ला हातावर घेतला. दुधावडे जीव वाचवून घरात गेले. याच आवाजाने जवळ राहणारे तावजी केदार मदतीसाठी येत असताना बिबट्याने त्यांच्यावरही हल्ला केला. हल्ल्यात जखमी झाल्यावर उपचारासाठी ताहराबाद येथील ग्रामीण रुग्णालयात गेले. डॉ. जालिंधर घिगे यांनी जखमींवर प्रथम उपचार केले.
बिबट्याच्या हल्ल्यात दोघांसह गायी जखमी
By | Updated: December 9, 2020 04:16 IST