शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

स्नेहालयातील दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू

By admin | Updated: May 23, 2014 01:27 IST

अहमदनगर : एम.आय.डी.सी. भागातील स्नेहालयाच्या विशेष बालगृहातील दोन मुले निंबळक येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते.

अहमदनगर : एम.आय.डी.सी. भागातील स्नेहालयाच्या विशेष बालगृहातील दोन मुले निंबळक येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. तलावात पाण्याचा अंदाज न आल्याने गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास त्यांचा बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात मुलांच्या अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. विकास किशोर ससाणे (वय १४, रा. लाल टाकीनगर ) आणि मयूर संताराम मापारी (वय १३, रा. निफाड, जि. नाशिक) अशी मयत मुलांची नावे आहेत. एम.आय.डी.सी. परिसरात स्नेहालयाचे विशेष बालगृह आहे. या बालगृहात काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांचे पालन-पोषण केले जाते. विकास आणि मयूर ही दोन मुले याच बालगृहात होती. गुरुवारी दुपारी विनापरवाना ती बाहेर पडली आणि थेट निंबळक परिसरात असलेल्या तलावामध्ये पोहण्यासाठी गेली. तलावात पाण्याचा अंदा ज न आल्याने ती बुडाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दोन मुलांचे मृतदेह तरंगत असल्याचे ग्रामस्थांनी तलावात पाहिले. त्यानंतर त्या मुलांना तलावातून बाहेर काढून नगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मुलांची तपासणी करून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. दरम्यान एम.आय.डी. सी. पोलीस ठाण्यात मुलांच्या पालकांनी धाव घेतली आणि संस्थेचे अधीक्षक आणि काळजीवाहक हेच मुलांच्या मृत्युला जबाबदार असल्याचा टाहो फोडला. त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मुलांचे मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. मुलांच्या पालकांनी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात सायंकाळी संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यासाठी पालक व नातेवाईकांची ठाण्यात गर्दी झाली होती. ————- मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला, याबाबत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कारवाईबाबत निर्णय घेता येईल. मुलांच्या पालकांनी संस्थेचा निष्काळजीपणाच मुलांच्या मृत्युस कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. त्याबाबत चौकशी करूनच कारवाई करण्यात येईल. -किरणकुमार बकाले, सहा. पोलीस निरीक्षक बालगृहात सध्या उन्हाळी शिबिर सुरू आहे. दुपारच्यावेळी मुलांची जेवणाची सुट्टी झाली होती. मुलांची जेवणे झाल्यानंतर त्यांना थोडी मोकळीक दिली जाते. नेमक्या याच काळात दोन मुले शिबिरातून पळून गेली. शिबिर पुन्हा सुरू झाल्यानंतर दोन मुले नसल्याचे लक्षात आल्याक्षणीच संस्थेचे काळजीवाहक राजेंद्र वाकचौरे यांनी संस्थेच्या अन्य कर्मचार्‍यांमार्फत मुलांचा शोध घेतला. काही वाटसरुंनी मुले तलावाकडे गेल्याचे सांगितले. तिथे वाकचौरे यांनी चौकशी केली असता तलावात मुले बुडाल्याचे समजले. मुलांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यात अपयश आले. ग्रामस्थांच्या मदतीने मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. झालेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेमध्ये संस्थेचा कोणताही निष्काळजीपणा झालेला नाही. -वैजनाथ लोहार, अधीक्षक, बालगृह