संगमनेर : तालुक्यातील कोळवाडे गावातील कडूवस्ती येथे शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास २२ लाख रुपये किमतीची सुगंधी तंबाखू व पान मसाला पोलिसांच्या पथकाने पकडला़ रविवारी सकाळी पंचनामा करुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु झाले आहे़नगर येथील प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांना मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी कडूवस्ती येथे छापा टाकला़ यावेळी एका खोलीत साठवलेला मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखू व पान मसाला त्यांना आढळून आला़ त्यांनी हा मुद्देमाल जप्त सील करुन अन्न व औषध प्रशासनाला माहिती कळविली़ त्यानंतर रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आऱ डी़ पवार पथकासह घटनास्थळी पोहोचले़ त्यांनी पंचनामा करुन पुढील कार्यवाही करण्याचे काम केले सुरु आहे़ पवार म्हणाले, हा मुद्देमाल सुमारे २२ लाखाचा असून, तो माल जोर्वे येथील अनिल दिघे यांच्या मालकीचा आहे़ कडूवस्ती येथील रंगनाथ कारभारी कडू यांच्या घरात हा मुद्देमाल साठविला होता़ त्याचा पंचनामा करण्यात आला आहे़ याबाबत आज नगरला गुन्हा दाखल करण्यात येईल़
संगमनेरात बावीस लाखाची सुगंधी तंबाखू पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 13:39 IST