शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नगर तालुक्यातील १७ स्वस्त धान्य दुकानांचे परवाने अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 12:31 IST

स्वस्त धान्य दुकानातील जे लाभार्थी धान्य घेण्यास पात्र आहेत त्यांना १०० टक्के पॉस मशिनद्वारे धान्य वाटप करण्यात येत आहे.

केडगाव : स्वस्त धान्य दुकानातील जे लाभार्थी धान्य घेण्यास पात्र आहेत त्यांना १०० टक्के पॉस मशिनद्वारे धान्य वाटप करण्यात येत आहे. मात्र नगर तालुक्यातील १७ स्वस्त धान्य दुकानदार पॉस मशिनचा वापर करीत नसल्याचे आढळल्याने त्या १७ दुकानदारांचे परवाने निलंबित करण्याचा अहवाल नगरचे तहसीलदार अप्पासाहेब शिंदे यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पाठविला आहे. त्यामुळे दुकानदारांचे परवाने आता अडचणीत आले आहेत.सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना पॉस मशिनद्वारे १०० टक्के धान्याचे वाटप करण्याचे सरकारचे आदेश आहेत. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने याबाबत स्वस्त धान्य दुकानदारांना याबाबत बैठकीत हे आदेश दिले आहेत. त्यानुसार मार्च २०१८ पासून पॉस मशिन आॅनलाइन सुरू झाल्यानंतर जे लाभार्थी धान्य घेण्यास पात्र आहेत, त्यांना १०० टक्के पॉस मशिनवर धान्य वितरण करावे,ज्या गावांना रेंज नाही, अशा १४ गावांना जिल्हाधिकाºयांनी पारंपरिक पद्धतीने धान्य वाटण्यास परवानगी दिली आहे. जर एखाद्या ठिकाणी धान्य उशिरा पोहचले असेल किंवा पॉस मशिन खराब झाली असेल, अथवा रेंज नसल्यामुळे धान्याचे वाटप करता आले नाही, अशा दुकानाबाबत तहसीलदारांची परवानगी घेऊन पारंपरिक पद्धतीने वाटप करण्याच्या सूचना दिल्या होत्या.गेल्या महिन्यात जिल्हा पुरवठा अधिका-यांनी नगर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक घेतली. यात ज्या स्वस्त धान्य दुकानदारांनी पॉस मशिनवर ५० टक्केपेक्षा कमी धान्य वाटप केले आहे,तसेच ज्यांना रेंज असूनही त्यांनी मशिनद्वारे ५० टक्केपेक्षा कमी धान्य वाटप केले, अशा १७ दुकानदारांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार नगर तहसील कार्यालयातील ४ नायब तहसीलदार, पर्यवेक्षक,अव्वल कारकून, मंडळाधिकारी व तलाठी यांच्यामार्फत तपासणी करण्यात आली. यात दुकानांचे परवाने निलंबित करण्याचा अहवाल तहसीलदारांनी जिल्हा पुरवठा अधिका-यांना सादर केल्याने या दुकानदारांचे परवाने अडचणीत सापडले आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर