शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुलगा असल्याचे भासवून जमीन लुबाडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 17:20 IST

शाळेचा बनावट दाखला दाखवून मुलगा असल्याचे भासवून जमीन लुबाडण्याच्या उद्देशाने वृध्दाची फसवणूक करणाऱ्या इसमाविरोधात राहाता पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

राहाता : शाळेचा बनावट दाखला दाखवून मुलगा असल्याचे भासवून जमीन लुबाडण्याच्या उद्देशाने वृध्दाची फसवणूक करणाऱ्या इसमाविरोधात राहाता पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.राहाता पोलिसात भिवाजी गंगाधर गोडगे ( वय ६०, रा. केलवड ) यांनी फिर्याद दिली. यात त्यांनी म्हटले आहे की, मी माझ्या पत्नीसोबत केलवड येथे राहत असून लग्नानंतर आम्हाला १८ जुलै १९८५ मध्ये एक अपंग मुलगा झाला. त्याचे नाव आम्ही किरण ठेवले. मात्र तो दहा वर्षाचा झाल्यानंतर आम्हाला त्याला पोसणे अवघड झाल्याने आम्ही त्याला १ जून १९९५ रोजी नासिक आडगाव येथील प्रेमदान मदर तेरेसा आश्रमात टाकले. दरम्यान आमच्या भावकीतील तेरेजा बापू गोडगे ही महिला एक दिवस केलवड या ठिकाणी आली. तुमचा मुलगा मोठा झाला असून तो व्यवस्थित आहे. तो आता गोव्यात राहतो. मी तुमची भेट घालून देते, असे सांगितल्याने या महिलेच्या सांगण्यावरुन आम्ही त्या महिलेचा भाऊ साईनाथ बापू गोडगे, मी व माझी पत्नी गोव्याला आमचा मुलगा पाहण्याकरीता गेलो. त्यांनी प्रदीप नावाच्या मुलाची आम्हाला भेट घडवून हा तुमचा मुलगा आहे असे सांगितले. तुम्हाला जर तुमचा मुलगा परत न्यायचा असेल तर आश्रमाकरिता साठ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. आमच्याकडे इतके पैसे नाहीत. शेवटी तडजोड करुन चाळीस हजार रुपये तेरेजा गोडगे या महिलेला देऊन मुलगा घरी घेऊन आलो.मार्च २०१३ ते २७ सप्टेंबर २०१९ दरम्यान या मुलाला घरी आणल्यानंतर तो काही दिवसातच आमच्याशी व्यवस्थित बोलत नव्हता. एक वर्षानंतर आम्ही या मुलाचे लग्न करुन दिले. त्याला एक मुलगाही झाला. यानंतर तो आम्हाला अधिक त्रास देत जिवे मारण्याची धमकी देत छळ करु लागला. मुलगा आमच्याशी परक्यापणे वागत असल्याने हा आमचाच मुलगा आहे का? याची चौकशी केली असता त्याच्या जवळील शाळेचा दाखला बनावट असल्याचे लक्षात आले. यानंतर आम्ही ज्या आश्रमात मुलगा टाकला होता, तेथे मुलाची चौकशी केली असता आमचा मुलगा आश्रमात भर्ती केल्यानंतर चार महिन्यात मयत झाल्याचे सांगण्यात आले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाता