अहमदनगर : साहेब़़़, लयी प्रयत्न केले पण, काहीही उपयोग झाला नाही़ अखेर डाळिंबाची बाग जळून गेली़ आता आम्ही करायचे काय ते तुम्हीच सांगा, अशा व्यथा मांडवगण येथील शेतकरी आसाराम बापू बोरुडे यांनी दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर मांडली़ केंद्रीय मंत्रालयातील आय राणी कुमोदिनी यांच्या नेतृत्वाखालील पाच प्रमुख अधिकाऱ्यांचे पथक बुधवारी दुपारी येथील शासकीय विश्रामगृहात दाखल झाले़ जिल्ह्यातील टंचाईची माहिती घेऊन कुमोदिनी यांच्यासह आऱ एच़ सिंग, डॉ़ एच़ आर. खन्ना, बी़ के.मिश्रा रेड्डी यांच्यासह ताफा नगर तालुक्यातील वाळकी गावाकडे निघाला़ दौरा अचानक आल्याने दुष्काळाची माहिती मिळविण्यापासून ते पाहणीकरिता गावांची निवड करताना प्रशासनाची दमछाक झाली़ वाळकी गावातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या छावणीला पथकाने भेट दिली, शेतकऱ्यांशी संवाद साधला़श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगणला येथील आसाराम बापू बोरुडे यांच्या डाळिंबाच्या बागेची पथकाने पाहणी केली़ यावेळी पैसे खूप खर्च झाले़ शेततळे केले़ पाणी साठविण्यासाठी सिमेंटची टाकी तयार केली़ ठिबक केले़ मात्र बाग वाचवू शकलो नाही़ अखेर बाग जळून खाक झाली़ उत्पन्न तर नाहीच, पण झालेला खर्चही वसूल झाला नाही, अशी व्यथा त्यांनी पथकासमोर मांडली़ यावेळी विभागीय आयुक्त एकनाथ डौले, राज्य आपत्ती व्यवस्थापनप्रमुख सुहास दिवसे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, नगरचे तहसीलदार सुधीर पाटील, श्रीगोंदाचे तहसीलदार वंदना खरमाळे, तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ दारकुंडे उपस्थित होते़पाहणी कशासाठीराज्य सरकारने रब्बीच्या नुकसान भरपाईसाठी २ हजार २५१ कोटी रुपयांची केंद्र सरकारकडे मागणी केली आहे़ या पार्श्वभूमीवर हे पथक पाहणी करीत आहे़ नगर, श्रीगोंदा, कर्जत तालुक्यातील मोजक्याच गावांना भेटी देऊन सायंकाळी हे पथक सोलापरकडे रवाना झाले़पथकाचा धावता दौराकेंद्रीय पथकाने रात्री उशिरा नगर जिल्ह्याची पाहणी करण्याचे ठरविले व तसे जिल्हा प्रशासनास कळविले़ रात्री उशिरापर्यंत दुष्काळाची माहिती व गावांची निवड करण्यात आली़ त्यामध्ये नगर तालुक्यातील तीन, श्रीगोंदा तालुक्यातील एक आणि कर्जत तालुक्यातील तीन गावांचा समावेश होता़ मात्र, पथकाने नगर तालुक्यातील वाळकी येथील छावणीला भेट दिली़ तांदळी वडगावातील जलयुक्तच्या कामांची पाहणी केली़ त्यानंतर पथक श्रीगोंदा तालुक्यात दाखल झाले़ तालुक्यातील एकमेव मांडवगण गावाची पाहणी करून पथक मिरजगावमध्ये दाखल झाले़ तेथील रोजगार हमीच्या कामांना भेट देऊन पथक सोलापूरकडे रवाना झाले़ कर्जत तालुक्यातील मांदळी व थेरगाव येथे ग्रामस्थ पथकाच्या स्वागतासाठी उपस्थित होते़ मात्र, पथक या गावांना भेटी न देता निघून गेले़
लयी प्रयत्न केले; पण बाग वाचली नाही
By admin | Updated: June 2, 2016 00:57 IST