शहरात दिवंगत नेते रामराव आदिक यांचा पुतळा बसविण्यात आला. त्याकरिता अवघ्या पंधरा दिवसांत मंजुरी घेण्यात आली. मात्र छत्रपतींच्या पुतळ्यासाठी तांत्रिक अडचणी सांगितल्या जातात. शिवाजी चौकाऐवजी हरेगाव, काँग्रेस भवन, तसेच कालव्याच्या कडेला पुतळा बसविण्याचे प्रयत्न झाले तर शिवप्रेमी मान्य करणार नाहीत. इतरत्र कुठेही पुतळा बसविण्याचा प्रयत्न करू नयेत अन्यथा नगराध्यक्षा आदिक यांना माफ केले जाणार नाही, असा इशारा चित्ते यांनी दिला.
गेल्या ४० वर्षांपासून या पुतळ्यांसाठी शहरवासीय लढा देत आहेत. मागील सत्ताधारी तसेच आताच्या मंडळींनी पालिकेच्या माध्यमातून त्याकरिता कोणतेही प्रयत्न केले नाहीत. शेजारील वैजापूर तालुक्यामध्ये पुतळ्यांकरिता अडचणी येत नाहीत. मात्र श्रीरामपुरात कारणे दिली जातात, असा आरोप चित्ते यांनी केला.
पालिकेने पुतळ्याकरिता सर्वसाधारण सभेत ठराव घ्यावा. नव्याने राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करावा. सर्व आवश्यक तांत्रिक बाबींना मंजुरी घ्यावी. नगराध्यक्षा आदिक यांनी महाविकास आघाडीचे सरकारकडे पाठपुरावा करावा. अन्यथा तीव्र संघर्ष हाती घेतला जाईल, असा इशारा चित्ते यांनी दिला.
------