शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शोकसभेत अपघातातील मृतांना श्रद्धांजली

By चंद्रकांत शेळके | Updated: May 15, 2023 22:52 IST

कामाचा कितीही व्याप असला तरी कोणालाही रविवारी कार्यालयात बोलावले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

चंद्रकांत शेळके, अहमदनगर: नाशिक येथून प्रशासकीय काम करून परतत असताना जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांचा शनिवारी अपघाती मृत्यू झाला. ही न भरून येणारी हानी आहे. परंतु यातून इतर कर्मचाऱ्यांनी बोध घेऊन सक्तीने रात्रीचा प्रवास टाळावा. तसेच कामाचा कितीही व्याप असला तरी कोणालाही रविवारी कार्यालयात बोलावले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

शनिवारी नाशिकहून प्रशासकीय काम करून परतत असताना नगर जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विभागाचे कक्ष अधिकारी अशोक व्यवहारे आणि महिला बालकल्याण विभागाचे लिपिक विनायक कातोरे यांचा नगर-मनमाड रोडवर वांबोरी फाट्यानजीक झालेल्या अपघातात मृत्यू झाला. सोमवारी दुपारी या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सभागृहात शोकसभा घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संजय कुमकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, प्रभारी कॅफो राजू लाकडझोडे, शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे अध्यक्ष संजय कडूस, सुभाष कराळे, विकास साळुंके, शशिकांत रासकर आदींसह कर्मचारी उपस्थित होते.या दुर्दैवी घटनेमुळे सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण तसेच इतर गोष्टी समोर आल्या आहेत. सुरक्षितता म्हणून प्रत्येकाने रात्रीचा प्रवास टाळलाच पाहिजे. तसेच रविवारी कोणालाही कामावर बोलावण्यात येणार नाही. खूपच तातडीची गरज असेल तर शनिवारी कोणाला बोलावले तर संबंधित खातेप्रमुखानेही उपस्थित राहावे. कामाचे योग्य वाटप व नियोजन केल्यास कोणत्याही कर्मचाऱ्यावर अतिरिक्त ताण येणार नाही. त्यादृष्टीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश येरेकर यांनी दिले.

संभाजी लांगोरे यांनी शासनाकडून किंवा जिल्हा परिषदेकडून आवश्यक ती मदत मृतांच्या कुटुंबीयांना देण्याची ग्वाही दिली. कर्मचाऱ्यांनी भावना व्यक्त करताना अतिरिक्त कामाचा ताण कमी करावा, रिक्त पदे भरावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर