यावेळी शहीद स्मारकाचे काम सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. माजी मंत्री शिवाजी कर्डिले, उपवनसंरक्षक सुवर्णाताई माने, तहसीलदार उमेश पाटील, आरएफओ सुनील थिटे, सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, पोलीस निरीक्षक सतीश शिरसाठ, प्राचार्य बिडवे, डॉ. दरंदले, हभप राम घुले महाराज, जीएसटी अधिकारी अमोल धाडगे यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
तहसीलदार उमेश पाटील यांनी शहीद जवानांना मानवंदना देत शहीद परिवार व आजी-माजी सैनिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येणार असल्याचे सांगितले. सैनिकांची मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. सैनिकांमुळे आपण सुरक्षित असल्याचे ते म्हणाले. यावेळी गणेश बोरुडे, अमोल कांडेकर, फाऊंडेशनचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, निवृती भाबड, संतोष मगर, संभाजी वांढेकर, मनसुक वाबळे आदी उपस्थित होते.