शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात आदिवासी महिला ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 13:36 IST

आदिवासी भागातील एका महिलेला बिबट्याने आज पहाटे हल्ला करून ठार केले. या महिलेला बिबट्याने घरापासून तीनशे मीटर फरपटत नेले. छातीवरील भाग व पाय बिबट्याने तोडला.

- हेमंत आवारीअकोले (जि. अहमदनगर) : आदिवासी भागातील एका महिलेला बिबट्याने आज पहाटे हल्ला करून ठार केले. या महिलेला बिबट्याने घरापासून तीनशे मीटर फरपटत नेले. छातीवरील भाग व पाय बिबट्याने तोडला.  या हल्ल्यात महिला ठार झाली. महिलेचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला आहे.

धरणग्रस्त आदिवासी महिला तुळसाबाई/ रत्नाबाई तुकाराम खडके (वय ६५) निळवंडे गावच्या कोकणेवाडी शिवारात, सर्वे नंबर ३४ मध्ये प्रकल्पग्रस्त म्हणून जमीन मिळाली. जंगलात वस्ती आहे. पहाटे चार वाजता बिबट्याने हल्लाकरून बकरू ठार केले. नंतर वृध्देवर हल्लाकरून तीस जंगलात  ४०० फुटांवर ओढत नेले. वृध्देच्या मानेवर जखम असून एक पाय व छातीचाभाग बिबट्याने तोडला आहे.

निळवंडे गावात चार दिवसांपुर्वी मध्य वस्तीत रात्री साडे नऊला बिबट्या घुसला होता. बिबट्याने हल्ला करून सत्यवान गायकवाड याच्या ओट्यावरून मांजर नेली. या ओट्यावर मांजरी शेजारीच छोटा मुलगा होता. तो बचावला, गायकवाड यांनी आरडाओरड केल्यावर बिबट्या पसार झाला.बिबट्याची दहशत निळवंडे कोकणेवाडी निंब्रळ परिसरात असून नागरीक भयभीत झाले आहेत.

वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री साळवे काय म्हणतात...या परिसरात बिबट्या आहे. दोन तीन दिवसांपासून बिबट्या येत होता. छपराच्या घराला दरवाजा नसल्याने बिबट्याने घरात घुसून अपंग वृध्देवर हल्ला केला.  नागरिकांनी सतर्क राहावे. पाळीव जनावरे बंदिस्त ठेवावे. आपली व घरातील लहान बालके वृध्द  यांची काळजी घ्यावी.

निळवंडे धरणग्रस्त आदिवासी अपंग महिला रखमाबाई  तुकाराम खडके वय ६५, निळवंडे गावच्या कोकणेवाडी शिवारात, सर्वे नंबर ३४ मध्ये प्रकल्पग्रस्त म्हणून जमीन मिळाली.जंगलात वस्ती आहे. गुरूवारी पहाटे घटना घडली, पहाटे वृध्देचा आरोडल्याचा आवाज ऐकला पण वस्ती एकटी अंधारात पळणार कुठे ?  ३०० मिटर ओढत नेले. शोध घेईपर्यंत बराच उशीर झाला होता. बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या वृध्देचा भाचा सुभाष विठ्ठल खडके, दगडू ठका पारधी यांनी सांगितले.

पहाटे चार वाजता बिबट्याने हल्लाकरून बकरू ठार केले. नंतर वृध्देवर हल्लाकरून तीस जंगलात  ३००  मीटरच्या पुढे ओढत नेले. वृध्देच्या मानेवर जखम असून एक पाय व छातीचाभाग खाल्ला आहे.निळवंडे गावात चार दिवसांपुर्वी मध्य वस्तीत राञी साडे नऊ च्या बिबट्या घुसला होता. बिबट्याने हल्ला करून सत्यवान गायकवाड याच्या ओट्यावरून मांजर नेली. या ओट्यावर मांजरी शेजारीच छोटा मुलगा होता. तो बचावला, गायकवाड यांनी आरडाओरड केल्यावर बिबट्या पसार झाला. बिबट्याची दहशत निळवंडे कोकणेवाडी निंब्रळ परिसरात असून नागरीक भयभीत झाले आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरleopardबिबट्या