कोपरगाव : वारी येथील दिगवंत ग्रामपंचायत सदस्य राहुल टेके यांच्या स्मरणार्थ राहुल दादा टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांच्या सहकार्यातून अभिनेते चिन्मय उदगीरकर व अभिनेत्री मयूरी कापडने यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.१२) वारी येथे वृक्षारोपण करण्यात आले.
या सोहळ्यासाठी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, तहसीलदार योगेश चंद्रे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, कामगार नेत्या वंदना पवार, माजी सभापती मच्छिंद्र टेके, मुख्याध्यापक मंजुषा सुरवसे, सौमैंया उद्योग समूहाचे संचालक सुहास गोडगे, उपमहाव्यवस्थापक बी. एम. पालवे, बी. पी. पाटील, वरिष्ठ कामगार अधिकारी संजय कराळे, वारी सेवा संस्थेचे माजी संचालक मधुकरराव टेके, सामाजिक कार्यकर्ते विशाल आढाव, कामगार संघटनेचे उपाध्यक्ष संजय टेके, विशाखा निळे, मच्छिंद्र टेके महाराज, उपसरपंच मनीषा गोर्डे, सदस्या रोहिणी निळे, सुवर्णा गजभिव, अनिता संत, वनिता चव्हाण, नंदा निळे, ग्रामविकास अधिकारी दिलीप वारकर, गोरख टेके, सुदाम टेके, सुनील टेके, वसंत टेके, मंजाहरी टेके, पंडित वीर, धोंडिराम, हिवरे, कैलास इथापे, रामदास सोनवणे, अशोक टेके, भीमा आहेर, धोंडीबा वाकचौरे, नितीन चौधरी, सुखदेव मैंद, विलास गोंडे, शंकर गोंडे उपस्थित होते.
शिबिरासाठी मधुकर सोनवणे, विजय निळे, बापू वाकचौरे, अशोक निळे, सूरज बोर्डे, रघुनाथ आहेर, मच्छिंद्र मोरे, भास्कर बोर्डे, सचिन मोकळ, आप्पासाहेब थोरमीसे, सचिन मैंद, अजीम शेख, चंद्रकांत पाटील, दौलत वाईकर, मच्छिंद्र मुरार, प्रा. रवींद्र जाधव, ‘लोकमत’चे उपसंपादक राेहित टेके, सूरज टेके, प्रथमेश टेके, स्वप्निल टेके, बिपिन टेके, पुरुषोत्तम टेके, साईराज टेके, अनुराग टेके आदींनी परिश्रम घेतले.
............
स्वर्गीय राहुल टेके यांचे सामाजिक कार्य मोठे होते. याच माध्यमातून तीन वर्षांपूर्वी त्यांची माझी भेट झाली होती, तसेच त्यांना पर्यावरणाबद्दल खूप आस्था होती. त्यांच्या निधनानंतर त्यांचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांचे कुटुंबीय, मित्र परिवार परिश्रम घेत आहेत, ही खूप महत्त्वाची बाब आहे.
- चिन्मय उदगीरकर, सिनेअभिनेता.
........
पर्यावरणात झाडांचे खूप महत्त्व आहे. झाडे लावण्याचे फायदे सर्वांनाच माहिती आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त झाडे लावून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
-मयूरी कापडने, सिनेअभिनेत्री.
- -- - -- -
फोटो १२- वृक्षारोपण, कोपरगाव
वारी (ता. कोपरगाव) येथे सिनेअभिनेते चिन्मय उदगीरकर व सिनेअभिनेत्री मयूरी कापडने यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. (छायाचित्र : श्रीकांत नरोडे )
120721\dsc_4239.jpg
वारी (ता. कोपरगाव ) येथे सिनेअभिनेते चिन्मय उदगीरकर व सिनेअभिनेत्री मयुरी कापडने यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. (छायाचित्र : श्रीकांत नरोडे )