कर्जत नगरपंचायतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये सहभाग घेतला. यानंतर माझी वसुंधरा या स्पर्धेत सहभाग घेतला व राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. आता माझी वसुंधरा स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात सहभाग घेतला आहे. त्यामुळे कर्जत शहर व उपनगरात स्वच्छता मोहीम व वृक्ष लागवड सुरू आहे. लावलेल्या वृक्षांचे संगोपन व्हावे, म्हणून सचिन कुलथे यांनी स्वखर्चाने दीड लाख रुपये किमतीचे दोनशे ट्री गार्ड कर्जत नगरपंचायतीला दिले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, प्रसाद ढोकरीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील शेलार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल म्हेत्रे, नगरसेवक बापूसाहेब नेटके, लालासाहेब शेळके, नगरसेविका मनिषा सोनमाळी, डॉ. शबनम इनामदार, माजी सरपंच संतोष म्हेत्रे, दिलीप जाधव, सतीश पाटील, भास्कर भैलुमे, शरद राऊत उपस्थित होते. (वा.प्र.)
(फोटो - कर्जत शहरातील नामवंत सराफ सचिन कुलथे यांनी कर्जत नगरपंचायतीला मोफत दोनशे ट्री गार्ड आमदार रोहित पवार यांच्या हस्ते मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्याकडे सुपूर्द केले.)