शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

अहमदनगरमधील लग्नात ठेवला पुस्तकांचा रूखवद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 12:58 IST

सर्व प्रथांना, खर्चाला फाटा देत नगरमधील वधू-वराने लग्नाचा मंडप पुस्तकरुपी रूखवादानं सजविला. पुस्तकरुपी रूखवादाच्या माध्यमातून अमर महादेव कळमकर आणि वधू राणी मेघनाथ तोरडमल यांनी समाजासमोर एक आगळा-वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

ठळक मुद्देविनामुल्य स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्यासाठी वधू-वराचा संकल्प

नवनाथ खराडेअहमदनगर : लग्न म्हटलं की फेटे, हारतुरे, मानपान अन सत्काराचा जंगी सोहळा. डीजेचा दणदणाट अन फटाक्यांची आतषबाजी. लाडू, करंजी, शेव यासह अनेक मोठमोठ्या वस्तूंच्या रुखवदानं सजलेला मांडव. यासाठी होणारा अनाठायी खर्च. मात्र या सर्व प्रथांना, खर्चाला फाटा देत नगरमधील वधू-वराने लग्नाचा मंडप पुस्तकरुपी रूखवादानं सजविला. पुस्तकरुपी रूखवादाच्या माध्यमातून अमर महादेव कळमकर आणि वधू राणी मेघनाथ तोरडमल यांनी समाजासमोर एक आगळा-वेगळा आदर्श निर्माण केला आहे.श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील अमर महादेव कळमकर यांचा कर्जत तालुक्यातील राणी मेघनाथ तोरडमल यांच्याशी आज विवाहबध्द झाले. हा पुस्तकरुपी लग्नसोहळा आज सकाळी अकरा वाजता नगर शहरातील गंगा लॉन्स येथे पार पडला. यावेळी आदर्शगाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार व ज्येष्ठ सामाजिक कार्येकर्ते राजाराम भापकर गुरुजी उपस्थित होते. अमर आणि राणी उच्चशिक्षित असून दोघांनाही समाजसेवेची आवड आहे. कळमकर गेल्या १४ वर्षापासून समाजसेवेचे काम करत आहेत. स्वत:च्या कामाच्या जोरावर जिल्ह्यासह राज्यात अनेक गावे मॉडेल बनवली. भिंगारमधील इंदिरानगर झोपडपट्टी मॉडेल बनवली. दोनशेपेक्षा जास्त स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती शिबीर, वृक्षारोपण, पंढरपूर स्वच्छता अभियान, ३१ डिसेंबरला स्वच्छता अभियान, रेड लाइट एरियात रक्षाबंधन, आहार व आरोग्यावर मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली. डिजीटल इंडियासाठी शेतक-यांची बांधावर जाऊन जनजागृती. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आंदोलन. शेवगाव, नगर, राहुरी, पारनेर बसस्थानकांची स्वच्छता. भिका-यांसाठी रोजगार अभियान, सेंद्रिय शेती कार्यशाळा, तंटामुक्ती, व्यसनमुक्ती अभियान, युवक नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम, पाणलोट व जलसंधारणासाठी जनजागृती यासह विविध कामे गेल्या १४ वर्षांत कळमकर यांनी केली आहे. याच माध्यमातून नुकतेच युवा चेतना फौंडेशनची स्थापना करत युवकांची मोठी फौज उभी केली. वधू राणी तोरडमल याही पुण्यात गेल्या पाच वर्षापासून योगाच्या प्रसारासाठी काम करत आहेत.फेटे हारतुरे, सत्कार समारंभ, मानपानावर होणारा वायफळ खर्च टाळून पुस्तक रूपी रूखवताची मांडणी केली मांडवात केली गेली आहे. कुठल्याही प्रकारची सनई, वस्तू मांडवात नव्हत्या. आर्ट आॅफ लिव्हींगचे संस्थापक श्री श्री रविशंकरजी यांच्या उपस्थितीत दुपारी पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन केले जाणार आहे. रुखवदासाठी सव्वा दोन लाख रुपयांच्या पुस्तकांची खरेदी करण्यात आली आहे. भांडी, पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू ऐवजी पुस्तकांचे आहेर आणण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या पुस्तकभेटीतून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यासाठी मोफत ग्रंथालय उभारले जाणार आहे. अहमदनगर शहरातील लालटाकी शेजारी प्रशस्थ ग्रंथालय उभे करण्यात येणार आहे. यावेळी नगर जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते. 

  • साध्या पद्धतीने विवाह करण्याचा विचार होता. लग्नासाठी कुठल्याही प्रकारची लग्न पत्रिका छापली नाही. मी शिक्षण घेत असताना केवळ पुस्तक नसल्याने माझ्या शिक्षणात खंड पडला. त्यामुळे हा उपक्रम हाती घेतला आहे. खेड्यातून शहरात येणा-या मुलांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी पुस्तकांचा रुखवद मांडला. तसेच लग्नात येणा-या पुस्तकाच्या माध्यमातून विनामूल्य स्पर्धा परीक्षा केंद्र उभे करण्यात येणार आहे. - अमर कळमकर, वर

 

  • मी गेल्या पाच वर्षापासून समाजसेवेचे काम करते. मला लग्नाची कल्पना पटली. अमर कळमकर यांच्या विचारामुळे समाजासाठी काहीतरी करावे असे वाटले. हे काम अविरतपणे आम्ही सुरुच ठेवणार आहोत. - राणी तोरडमल, वधू
टॅग्स :Ahmednagarअहमदनगर