शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळसूबाई शिखरावरही पर्यटकांंना बंदी; बोरी ग्रामस्थांचा निर्णय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 15:15 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असणा-या बारी येथील ग्रामस्थांनी पर्यटकांसाठी कळसुबाई शिखर काही कालावधीसाठी बंद ठेवले आहे.

राजूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असणा-या बारी येथील ग्रामस्थांनी पर्यटकांसाठी कळसुबाई शिखर काही कालावधीसाठी बंद ठेवले आहे. तसा सूचना फलकही गाव वेशीबाहेरील कोल्हार-घोटी रस्त्याच्या कडेला ग्रामपंचायतीच्या वतीने लावण्यात आला आहे.सध्या राज्यात वेगवेगळ्या शहरांमध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. शासनामार्फत या संबंधात उपाययोजना राबविण्यात येत आहेत. खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन केले जात आहे. असे असतानाच राज्यातील सर्वात मोठे शिखर म्हणून ओळख असलेल्या कळसूबाई शिखरावर राज्यातून अनेक गियारोहक आणि पर्यटक येथे येत असतात. येणारे सर्व पर्यटक हे शहरी भागातून येत असतात. कोरोनाचे रुग्णही सध्या शहरी भागात आढळून येत आहेत. म्हणूनच खबरदारी म्हणून कळसुबाई शिखर पर्यटकांसाठी तेथील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने काही काळासाठी बंद ठेवले आहे. एव्हढेच नव्हे तर या नियमाचे उल्लंघन करणा-या पर्यटकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार असल्याचा उल्लेखही या फलकावर करण्यात आला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेkaleshwar Templeकाळेश्वर मंदिर