शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचा प्रवास... चक्क फुक्काट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 16:14 IST

साकुरी : स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही गावात अद्याप सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही़ त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करुन बक्कळ पैसा कमविण्याची संधी ...

साकुरी : स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही गावात अद्याप सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही़ त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करुन बक्कळ पैसा कमविण्याची संधी असताना एका तरुणाने चक्क गावक-यांना मोफत रिक्षासेवा सुरु केली आहे़ खडकेवाके ते राहाता असा सहा किलोमीटरचा प्रवास चक्क फुक्कट करण्यास मिळू लागल्यामुळे गावात आनंदीआनंद आहे़राहाता तालुक्यातील खडकेवाके हे जेमतेम लोकसंख्येचे गाव. स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही गावात अद्याप एस़टी़ बस येत नाही़ खासगी प्रवासी वाहतुकीचीही सुविधा नाही़ राहाता हे शहर अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असूनही गावकºयांना बाजाराला येण्या-जाण्यासाठी अनेकांच्या हाता-पाया पडून लिफ्ट मागावी लागते़ लिफ्ट मिळाली तर ठीक अन्यथा राहात्याची वारी ही पायीच ठरलेली़ त्यात आठवड्याचा बाजार करुन तो बोजा पाठीवर घेऊन येणे म्हणजे डोंगर उचलूनच गाव गाठल्यासारखे़ गावक-यांच्या वेदना जाणून खडकेवाके येथील सचिन मुरादे पाटील या तरुणाने गावक-यांसाठी चक्क मोफत रिक्षा सेवा सुरु केली़ गुरुवारी आठवडे बाजाराचे औचित्य साधून राहाता पंचायत समितीचे उपसभापती बाबासाहेब म्हस्के यांच्या हस्ते या मोफत रिक्षा सेवेचा प्रारंभ करण्यात आला़ खडकेवाके ग्रामस्थांना आठवडे बाजारात येण्या-जाण्यासाठी सचिन मुरादे या तरुणाने चक्क चार रिक्षा खरेदी केल्या़ या रिक्षांच्या माध्यमातून त्याला बक्कळ पैसा कमावण्याची संधी असताना त्याने चक्क चारही रिक्षांमधून ग्रामस्थांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे़ त्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे़