शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राहुरीच्या ग्रामीण रूग्णालयाला हवी ट्रॉमा सेंटरची जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:18 IST

राहुरी नगर परिषदेचा दवाखाना पुन्हा सुरू करून शासनाने ट्रॉमा सेंटर महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुरू केले तर आरोग्याच्या प्रश्नाचा तिढा सुटण्यास मदत होईल़. त्या दृष्टिकोनातून आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे़.

भाऊसाहेब येवले । राहुरी : येथील ग्रामीण रू ग्णालयाचा निधी मंजूर असूनही इमारतीचा प्रश्न मार्गी न लागल्याने सर्वसामान्य रूग्णांना हक्काच्या उपचारापासून दूर रहावे लागत आहे़. राहुरी नगर परिषदेचा दवाखाना पुन्हा सुरू करून शासनाने ट्रॉमा सेंटर महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुरू केले तर आरोग्याच्या प्रश्नाचा तिढा सुटण्यास मदत होईल़. त्या दृष्टिकोनातून आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे. राहुरी नगर परिषदेच्या दवाखान्याचे रूपांतर ग्रामीण रूग्णालयात करण्यात आले आहे. ग्रामीण रूग्णालयाची इमारत पडल्याने ग्रामीण रूग्णालय राहुरी नगर परिषदेच्या इमारत जागेत स्थलांतरित करण्यात आले. मात्र अपुरी जागा, डॉक्टरांची अनुपस्थिती, वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे रूग्णांना उपचार न मिळाल्याने अहमदनगर येथे जाऊन उपचार करावे लागत आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या परिसरात ट्रॉमा सेंटर सुरू केले तर अवघड शस्त्रकिया करणे शक्य होईल़. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने काही वर्षापूर्वी तुकाराम मोरे हे कुलगुरू असतांना डिग्रस परिसरात जागा देण्याचे मान्य केले होते. जागा वादग्रस्त व बाहेर असल्याने जागेचा प्रश्न सुटू शकला नाही.राहुरी नगरपरिषदेचे रूग्णालय सुरू ठेऊन ट्रॉमा सेंटर विद्यापीठात सुरू करण्याची गरज आहे. सध्या उपलब्ध होणारी ३७ गुंठे जागा अपुरी पडत आहे. श्रीरामपूर नगरपरिषदेचा दवाखाना शहरात व ग्रामीण रूग्णालय शिरसगावला आहे. नेवासा व संगमनेर येथेही याच पध्दतीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहे. राहुरी नगर परिषदेच्या माध्यमातून ओपीडी तर ट्रॉमा सेंटरच्या माध्यमातून अवघड शस्त्रक्रिया करणे शक्य होईल. त्यादृष्टिकोनातून राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शासनाकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला तर राहुरीच्या वैद्यकीय क्षेत्राचा महत्वाचा समजला जाणारा प्रश्न मार्गी लागणे शक्य होईल.राहुरी जिल्ह्यातील  मध्यवर्ती ठिकाण असून नगर मनमाड राष्ट्रीय मार्गावर आहे. अनेकदा अपघात झाल्यानंतर पेशंटला अन्य शहरांमध्ये पाठवावे लागत आहे. ट्रॉमा सेंटरसाठी शासन दरबारी पाठपुरावा केला तर प्रश्न मार्गी लागू शकतो. त्यामाध्यमातून इमर्जंसी आॅपरेशन, हाड, मेंदू यावर उपचार करता येतील़ सिझरच्या प्रश्नासह पोस्टमार्टमसह कर्मचारी निवासाचा प्रश्न मार्गी लागेल. रूग्णांना चांगल्या सुविधा देता येणे शक्य होईल़ महात्मा फुले कृषी विद्यापीठात जागा उपलब्ध होऊ शकते़, असे राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयाचे निवृत्त वैद्यकीय अधिकारी  यांनी सांगितले.     

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलAhmednagarअहमदनगर