शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकी वाहनातून मद्याची वाहतूक; साडेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 17:59 IST

संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील एका वाईन शॉपीमधून मद्याच्या बाटल्या घेऊन चारचाकी वाहनातून या बाटल्यांची अवैधरित्या वाहतूक करणा-या दोघांना पोलिसांच्या पथकाने पकडले. त्यांच्याकडून चारचाकी वाहन व मद्य असा एकूण ६ लाख ५३ हजार १०४ रूपयांचा मुद्देमाल जप्त करीत गुन्हा दाखल करण्यात आला.

घारगाव : संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील एका वाईन शॉपीमधून मद्याच्या बाटल्या घेऊन चारचाकी वाहनातून या बाटल्यांची अवैधरित्या वाहतूक करणा-या दोघांना पोलिसांच्या पथकाने पकडले. त्यांच्याकडून चारचाकी वाहन व मद्य असा एकूण ६ लाख ५३ हजार १०४ रूपयांचा मुद्देमाल जप्त करीत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई गुरूवारी रात्री आठच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर हॉटेल साई मल्हारसमोर करण्यात आली.   मुश्ताक इमाम सय्यद (वय ३४, रा. आंबीखालसा, ता. संगमनेर), संजय नाथा वाघ (वय ३८, रा. पत्र्याची वाडी, अकलापूर, ता. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल किशोर सुधीर लाड यांनी फिर्याद दाखल केली आहे.    मुश्ताक सय्यद व संजय वाघ या दोघांनी गुरूवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास घारगाव येथील हेरिटेज वाईन शॉपी येथून ५३ हजार १०४ रूपयांच्या मद्याच्या बाटल्या विक त घेतल्या. या बाटल्या बोलेरा (एम. एच. १७, बी. एस. १३३७) या चारचाकी वाहनातून घेऊन हे दोघे जात होते. दरम्यान नाशिक -पुणे महामार्गावरील हॉटेल साई मल्हारसमोर थांबले असता पोलिसांनी केलेल्या तपासणीत या वाहनात मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत मुद्देमाल हस्तगत केला.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी दुपारनंतर जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने बंद करण्यात आली आहेत. असे असताना मात्र,  हेरिटेज वाईन शॉपीमधून मद्याची विक्री सुरू होती. या प्रकरणाचा तपास पोलीस कॉन्स्टेबल रघुनाथ खेडकर करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरCrime Newsगुन्हेगारी