पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील तलाठी गणेश जाधव यांची बदली झाली. त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी कोरोना महामारीच्या लॉकडाऊन काळात बजावलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. तीन वर्षाच्या सेवा काळात त्यांनी वाळू तस्करी बाबतही निर्णायक भूमिका बजावली होती. यावेळी अनेकांकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी उपसरपंच श्रीकांत पवार, बळीराजा पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ तुवर, माजी उपसरपंच दिलीप पवार, ग्रामविकास अधिकारी कारभारी जाधव, शिवाजी कांबळे, सुनील गोळेचा, गणेश तुवर, सुधाकर शिंदे, भगीरथ पवार, अशोक तुवर, राजेंद्र तुवर, राजेंद्र देसाई, कचेश्वर कहार, भाऊसाहेब माळी, सत्तार पटेल, रामेश्वर पवार, उमेश कहार आदी उपस्थित होते.
---
०४ पाचेगाव