शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे रद्द झाल्याने प्रवाशांना मानसिक त्रास

By सुदाम देशमुख | Updated: September 3, 2022 12:26 IST

साईनगर (शिर्डी) ते हावडा, पुणे ते हावडा, मुंबई ते हावडा या एक्सप्रेस गाड्या रेल्वेने अचानक रद्द केल्याने महिन्याभरापूर्वी तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांना मानसिक त्रासा बरोबर आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे.

पुणतांबा:  (जि. अहमदनगर ):  

साईनगर (शिर्डी) ते हावडा, पुणे ते हावडा, मुंबई ते हावडा या एक्सप्रेस गाड्या रेल्वेने अचानक रद्द केल्याने महिन्याभरापूर्वी तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांना मानसिक त्रासा बरोबर आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे.

तीन सप्टेंबर रोजी हावडा जाणाऱ्या सर्व रेल्वे रद्द झाल्याने आगाऊ नियोजन करून तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांना परतीचे तसेच मधील तारखांचे आरक्षित केलेले सर्व तिकीट जीएसटीसह भुर्दंड सहन करून रद्द करावी लागली असून रेल्वेच्या या निर्णयाने प्रवासी संताप व्यक्त करत आहे तर स्थानिक पातळीवरील रेल्वे अधिकारी कोणतीच माहिती देऊ शकत नाही आणि अधिकृत माहितीसाठी मोठे शहर आणि विभागीय कार्यालयात जनसंपर्क अधिकारी असतात, पण तेही योग्य माहिती देऊ शकत नसल्याने फक्त ग्राहकांना भुर्दंड देणारा रद्द केलेल्या तिकिटांचा संदेश प्राप्त होत आहे. 

या झालेल्या नुकसानीचे भरपाई कोण देणार असाही प्रश्न उपस्थित होत असून काही मुलांच्या मेडिकलच्या परीक्षा चार तारखे दरम्यान असल्याने ते विद्यार्थी सुध्दा परीक्षेला मुकले असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसानीची कोण जबाबदारी स्वीकारणार असा संतप्त सवाल पालक वर्गात व्यक्त होत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर अधिकृत जनसंपर्क अधिकारी नेमून रद्द झालेल्या किंवा होणाऱ्या गाड्यांची माहिती आगाऊ मिळावी यासाठी अधिकाऱ्यांना हार तुरे वाहणाऱ्या  प्रवासी संघटनेने आंदोलन उभारण्याची मागणी सामान्य प्रवासी करत आहे. 

नामदेवराव धनवटे(स्थानिक प्रवासी): मी व माझ्या परिवारातील चौदा सदस्याचे तिकीट साईनगर ते हावडा आरक्षित केले होते. व त्याच अनुषगाने हावडा ते पुरी आणि पुन्हा पुरी ते साईनगर असे आरक्षित केलेले तिकिटे रद्द करावे लागले त्याचा आर्थिक फटका बसला तो वेगळा पण मानसिक त्रास वेगळाच. डी.बी. त्रिभुवन(पालक):  माझ्या मुलीची हावडा येथे मेडिकलची परीक्षा चार तारखेला होती पण रेल्वे रद्द झाल्याने परीक्षेला जाता आले नाही. 

रद्द झालेल्या गाड्या 1) jnaneshwari Exp (12101) लोकमान्य टिळक टर्मिनस ते शालिमार 2) Howrah mail (12809) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हावडा 3) LTT Shalimar EX(18029) लोकमान्य टिळक टर्मिनस ते शालिमार 4)SNSI Howrah Exp (22893) साई नगर शिर्डी ते हावडा

टॅग्स :railwayरेल्वे