शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

भीमा कोरेगावची दंगल हा भाजपाने निवडणुकीसाठी घडविलेला ट्रेलर - पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 20:44 IST

निवडणुकीची चाहुल लागताच हिंसाचार, जातीयवाद, दहशत निर्माण करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठीच भीमा कोरेगावची जातीय दंगल हा भाजपाने घडविलेला ट्रेलर होता, असा थेट आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

श्रीगोंदा : जीएसटी व नोटाबंदीमुळे विकासाचा दर मंदावला होता. नरेंद्र व देवेंद्र सरकार विकासाच्या मुद्यावर फेल झाले आहे. निवडणुकीची चाहुल लागताच हिंसाचार, जातीयवाद, दहशत निर्माण करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठीच भीमा कोरेगावची जातीय दंगल हा भाजपाने घडविलेला ट्रेलर होता, असा थेट आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात चव्हाण बोलत होते. यावेळी कृषी प्रदर्शन व नागवडे साखर कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीचे भूमीपुजन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.चव्हाण म्हणाले, पिकाला हमीभाव मिळत नाही. शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. शेतक-यांची कर्जमाफी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जाचक अटी घालून शेतक-यांची कुचेष्टा केली आहे. पण उद्योगपतींना २ लाख १२ हजार कोटींची कर्जमाफी दिली. जनतेच्या पैशातून ही कर्जमाफी केली जाणार आहे.कार्यक्रमास विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल जगताप, माजी मंत्री शंकरराव कोल्हे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, राजेंद्र नागवडे, माजी खासदार दादापाटील शेळके आदी उपस्थित होते.

नगरचं पाणी लयभारी

पुणे जिल्ह्यातील नेत्यांपेक्षा नगर जिल्ह्यातील नेत्यांना आयुष्य जादा आहे. आजही दादापाटील शेळके, शंकरराव कोल्हे, यशवंतराव गडाख यांच्यासारखे जेष्ठ पूर्ण क्षमतेने काम करतात. नगरचं पाणी लयभारी आहे, असा मिस्कील टिपण्णी हर्षवर्धन पाटील यांनी केल्यानंतर सभास्थानी एकच हशा पिकला.

पाचपुतेंनी घेतली नागवडेंची गळाभेट

राजकारणात माजी मंत्री बबनराव पाचपुते व राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्यात टोकाचा संघर्ष सर्वस्त्रुत आहे. पण बबनराव पाचपुते यांनी सभास्थानी येऊन नागवडेंची गळाभेट घेतली. दोघांच्या गळाभेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार