शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी, चार तास उलटूनही वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 13:24 IST

Pune Nashik Highway Traffic Update: आंबी खालसा फाटा, घारगाव, चंदनापुरी घात यादरम्यान दररोज महामार्गावर वाहतूक ठप्प होत आहे.

घारगाव : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात गुरुवारी (दि.१) सकाळी नऊ वाजलेपासून वाहतूक कोंडी सुरु झाली असून दुपारी एक वाजेपर्यंतपर्यंत वाहतूक सुरळीत झाली नाही. ठप्प झालेले रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे अन्यथा रस्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा वाहनधारकांसह ग्रामस्थांनी दिला आहे. परिसरात सुरु असलेल्या सिमेंट काँक्रेटीकरणाच्या कामाचा फटका वाहनधारकांना बसत असून वाहनचालक त्रस्त झाले आहेत. 

आंबी खालसा फाटा, घारगाव, चंदनापुरी घात यादरम्यान दररोज महामार्गावर वाहतूक ठप्प होत आहे. आज गुरुवारी सकाळपासून दीड किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. महामार्ग सिमेंट काँक्रेटीकरणाचे काम सुरु असून मुळा नदीवरील पुलावर पुणे लेनवर सध्या काम सुरु आहे. त्यामुळे वाहतूक नाशिक लेनने वळविण्यात आली आहे. एकेरी वाहतूक व अवजड वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. वाहतुकीचे योग्य नियोजन नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. या गोंधळावर प्रशासनासह वाहतूक पोलीसांचेकडून नियंत्रण ठेवण्यात आलेले नाही. कोंडीतून मार्ग काढण्यासाठी चालक मिळेल त्या जागेतून वाहने पुढे नेत असल्याने ही कोंडी अधिकच गुंतागुंतीची होत आहे. 

रस्त्याचे काम सुरु झालेपासून वाहतूक कोंडी होत आहे. महामार्ग प्रशासन व महामार्ग पोलिसांचे कोणतेही नियोजन नाही. घारगाव हे मोठे गाव असून येथे संथ गतीने काम चालू आहे त्यामुळे येथे दररोज वाहतूक कोंडी होत आहे. अपघात होत आहेत. रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत.-  अजय फटांगरे, मा.जिल्हा परिषद सदस्य.  

सहा महिन्यांपासून या रस्त्याचे काम सुरु आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी योग्य उपाययोजना न केल्याने अनेक अपघात झाले आहेत. अनेकजण मृत्युमुखी पडले आहेत. नेहमी वाहतूक कोंडी होत आहे. आम्ही महामार्ग प्रशासनाचे अधिकाऱ्यांना वेळोवेळी याबाबत कळविले आहे. मात्र, त्याचेकडून ठोस भूमिका घेतली जात नाही. ठेकेदार कंपनी व अधिकारी यांची मिलीभगत आहे का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. रस्त्याचे काम व वाहतूक सुरळीत न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.-  गौरव डोंगरे,सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीAhilyanagarअहिल्यानगरNashikनाशिक