शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांनो सावधान.. चांदबिबी महालाजवळ बिबट्याने दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 12:37 IST

चांदबीबी महालावर नागरिक दररोज किंवा सुटीच्या दिवशी फिरण्यासाठी मोठी गर्दी करतात. येथे रविवारी पर्यटकांंना बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे.

अहमदनगर : शहरापासून जवळच असलेल्या चांदबीबी महालावर नागरिक दररोज किंवा सुटीच्या दिवशी फिरण्यासाठी मोठी गर्दी करतात. येथे असलेल्या दाट झाडीमुळे या ठिकाणी अनेक वन्य प्राण्यांचे अस्तित्व देखील आहे. मात्र येथे रविवारी पर्यटकांंना बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे.

रविवारी (दि.७) सकाळी नगरमधील अभिजित पाडळकर, पराग गावडे, प्रवीण राठोड व अन्य मित्र रविवारची सुटी असल्याने या भागात फिरायला गेले होते. महालाच्या अलिकडे त्यांना रस्त्यापासून जवळच मोरांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आल्यामुळे रस्ता सोडून ते डोंगर उतारावर उतरले. रस्त्यापासून अवघ्या दोनशे फुटांवर ते मोरांच्या जवळ पोहोचले. 

यावेळी त्यांना बाजूच्या करवंदाच्या जाळीत मोरांच्या शिकारीसाठी बिबट्या दबा धरून बसलेला दिसला. हे तीन, चार जण जवळ पोहोचल्याचे पाहून त्याने डरकाळी फोडून पळ काढला. अचानक बिबट्या समोर दिसल्याने या युवकांनी घाबरून तेथून पळ काढला. याबाबत युवकांनी निसर्गमित्र व जिल्ह्याचे व्याघ्र संरक्षण समिती सदस्य मंदार साबळे यांना कळवले. येथे बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले. ठसे पाहता हा मध्यम वयाचा बिबट्या असून गेल्या आठ, दहा दिवसंपासून त्याचे या भागात वास्तव्य असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. 

 साबळे यांनी तातडीने जिल्हा उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी व वनपरिक्षेत्र अधिकारी एन. बी.पोकळे यांना याची माहिती दिली. याठिकाणी वनखात्याचे चेकपोस्ट आहे. या भागात नियुक्त केलेल्या कर्मचाºयांना या ठिकाणी गस्त वाढवून नागरिकांच्या फिरण्यावर लक्ष ठेवण्याविषयी सूचना दिल्या आहेत, असे रेड्डी यांनी सांगितले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरleopardबिबट्याforest departmentवनविभाग