कोपरगाव : शहरासह तालुक्यात बुधवारी (दि.२१) १३३ बाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे तालुक्याचा आकडा १२०१ वर गेला आहे. रॅपिड ॲण्टिजेन कीटद्वारे ३७९ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ९८ व्यक्ती बाधित आढळल्या तसेच खासगी लॅब अहवालात ६, नगर येथील अहवालात २९ असे एकूण तब्बल १३३ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. तसेच १८९ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले. तसेच ३१६ व्यक्तींच्या घशातील स्राव नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले.
तसेच शहरातील ६९, ७५, ६२, ४८ वर्षीय चार पुरुषांचा, तर तालुक्यातील कोळपेवाडी ६०, कोकमठाण ६०, चांदेकसारे ६८ या तीन पुरुषांचा अशा सात जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.