शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरीत अहमदनगर जिल्हा नाशिक विभागात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 12:46 IST

लाच स्वीकारल्याप्रकरणी शनिवारी (दि.९) एकाच दिवशी जिल्ह्यातील चार लोकसेवकांविरोधात कारवाई झाल्याने सरकारी कार्यालयातील लाचखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. जिल्ह्यात गेल्या नऊ महिने नऊ दिवसांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणी व स्वीकारल्याप्रकरणी २३ गुन्हे दाखल करत २७ लोकसेवकांना गजाआड केले आहे. लाचखोरीत नगर जिल्हा नाशिक विभागात गेल्या नऊ महिन्यांत प्रथमस्थानी राहिला आहे.

अरुण वाघमोडे 

अहमदनगर : लाच स्वीकारल्याप्रकरणी शनिवारी (दि.९) एकाच दिवशी जिल्ह्यातील चार लोकसेवकांविरोधात कारवाई झाल्याने सरकारी कार्यालयातील लाचखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. जिल्ह्यात गेल्या नऊ महिने नऊ दिवसांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणी व स्वीकारल्याप्रकरणी २३ गुन्हे दाखल करत २७ लोकसेवकांना गजाआड केले आहे. लाचखोरीत नगर जिल्हा नाशिक विभागात गेल्या नऊ महिन्यांत प्रथमस्थानी राहिला आहे.

लाच प्रकरणात नेहमीप्रमाणे सर्वाधिक गुन्हे महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाºयांच्या विरोधात आहेत. त्यानंतर पोलीस प्रशासनाचा नंबर लागतो. लाच स्वीकारल्याचे सर्व गुन्हे वर्ग २ व ३ मध्ये मोडणाºया अधिकारी-कर्मचाºयांच्या विरोधातील आहेत. पाच गुन्हे कंत्राटी अथवा अनुदानित तत्त्वावर काम करणाºया कर्मचाºयांच्या विरोधात आहेत. कोरोनामुळे जिल्ह्यातील इतर गुन्हेगारीचा आलेख मध्यंतरी खाली आला होता. लाच घेण्याचे प्रमाण मात्र काही कमी झालेले दिसत नाही.

च्नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अपसंपदा जमविल्याप्रकरणी गेल्या नऊ महिन्यांत ३  लोकसेवकाांवर गुन्हे दाखल केले आहेत. यात एक नायब तहसीलदार, एक वन विभागातील अधिकारी तर एका लोकप्रतिनिधीचा समावेश आहे. यंदा राज्यात प्रथमच नगरमध्ये अपसंपदाप्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले आहेत.अपसंपदेचे झाले तीन गुन्हे दाखल कुठलाही लोकसेवक शासकीय कामासंदर्भात लाच मागत असेल तर नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. तक्रारदार व्यक्तींना येणे शक्य नसेल तर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ‘१०६४’ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी. त्याची दखल घेऊन त्वरित कारवाई केली जाईल. तसेच सदर व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाते.-हरिष खेडकर, उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

विभागातील दाखल गुन्हे च्नाशिक १६, अहमदनगर २३, नंदूरबार ६, जळगाव १८, धुळे ११ अशा एकूण ७४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ नगर जिल्ह्यातील लाचेच्या जाळ्यात सापडलेले कर्मचारी महसूल ६, पोलीस ५, पंचायत समिती १, वस्तू व सेवा कर १, पाटबंधारे १, भूमिअभिलेख १, विद्युत ३, आरोग्य २, शिक्षण खाते १, सहकार खाते १, वनखाते १, इतर खासगी व्यक्ती ५ अशा २७ जणांवर गुन्हे दाखल आहेत़ 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग