शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटोने ३० दिवसात शेतकरी झाला मालामाल; ३५ गुंठ्यात पाच लाखांचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 15:38 IST

लॉकडाऊनच्या काळात ३० दिवसांत ३५ गुंठ्यात पावणे पाच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न संगमनेर तालुक्यातील अकलापूरच्या शेळकेवाडी येथील वैभव शिवाजी भोर यांनी मिळविले. लॉकडाऊनच्या अडचणीवर मात करत त्यांनी हे उत्पन्न मिळविले आहे.

रामप्रसाद चांदघोडे । 

घारगाव : शेतीमध्ये आधुनिक प्रयोगाचा वापर करत बाजारपेठेतील मागणीनुसार उत्पन्न घेतल्यास शेतक-याला नफा झाल्याशिवाय राहत नाही. या सर्व परिस्थितीचा अंदाज घेत लॉकडाऊनच्या काळात ३० दिवसांत ३५ गुंठ्यात पावणे पाच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न संगमनेर तालुक्यातील अकलापूरच्या शेळकेवाडी येथील वैभव शिवाजी भोर यांनी मिळविले. लॉकडाऊनच्या अडचणीवर मात करत त्यांनी हे उत्पन्न मिळविले आहे.  संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथील युवा शेतकरी वैभव  भोर यांनी यावर्षी ३५ गुंठ्यात टोमॅटोची लागवड केली. साधारणत: एप्रिल महिन्यात टोमॅटो बियाणे आणून रोपे तयार करून शेतात मल्चिंग टाकून लागवड केली. ४ बाय २ बेड अशा पद्धतीने सव्वा फूट अंतरावर दोन रोपांची लागवड केली. ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याचे आणि खताचे नियोजन केले. हवेतील आर्द्रता कमी करण्यासाठी  स्प्रिंकलरचा उपयोग केला आहे. ५० टक्के रासायनिक व ५० टक्के सेंद्रिय पद्धतीची औषधे त्यांनी वापरली. त्यामुळे टोमॅटोचे पीक जोमात आले. वेळेच्या वेळेला खते आणि पाणी त्यांनी दिले.

 कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे खते, औषधे मिळण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. अशा कठीण परिस्थितीत भोर यांनी टोमॅटोचे भरघोस उत्पन्न घेतले. ३५ गुंठ्यात भोर यांना आजपर्यंत बाराशे कॅरेट टोमॅटोचे उत्पादन मिळाले. आणखी पाचशे ते सहाशे कॅरेट अधिक उत्पन्न निघण्याची अपेक्षा आहे. पुुणे जिल्ह्यातील नारायणगाव या बाजारपेठेमध्ये या टोमॅटो विक्रीसाठी नेतात. ३५० ते ६५० रुपये एका कॅरेटला भाव मिळत आहे. 

बियाणे, मजुरी, फवारणी, खत, टोमॅटोचे झाडे बांधणे, फळे सोडणे, निंदण यासाठी दीड लाख रुपये खर्च झाला. खर्च वजा करून जवळपास पाच लाखांचे उत्पन्न टोमॅटोतून मिळणार आहे.

लॉकडाऊनच्या काळातच टोमॅटोची लागवड केली. त्यासाठी बियाण्यापासून खतासाठी कसरत करावी लागली. आधुनिक पध्दतीने टोमॅटोचे उत्पन्न घेतल्यामुळे चांगले उत्पादन मिळत आहे. रासायनिक आणि सेंद्रिय शेतीचा योग्य पध्दतीने जोड दिल्यास भरघोस उत्पादन मिळते. बाजारभावाची साथ मिळाल्यास अडचण येत नाही.- वैभव भोर, शेतकरी. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरAgriculture Sectorशेती क्षेत्र