अहमदनगर : लोकमत सखी मंच आयोजित व वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रायोजित सखी महोत्सव सोहळा रविवारी रंगणार आहे. महिलांच्या प्रतिभेला एक सशक्त मंच देत त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन देणार्या लोकमत सखी मंचतर्फे रविवारी महिलांसाठी सखी सम्राज्ञी हा सोहळा रंगणार आहे. रविवार, दिनांक १८ मे २०१४ रोजी सकाळी ११ वाजता सहकार सभागृह, स्टेशन रोड येथे हा सोहळा होणार आहे. या सोहळ्यास प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता शेवाळे या उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवाअंतर्गत ब्रायडल मेकअप, मेहंदी, समूहगीत गायन, सोलो डान्स, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, रेसीपी स्पर्धा आदी स्पर्धा होणार आहेत. या कार्यक्रमासाठी सखी मंच सदस्य व इतर महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) अॅडमॅडशोचे आकर्षण ‘‘सखी सम्राज्ञी’’ या अंतिम फेरीत प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता शेवाळे या उपस्थित राहणार आहेत. तसेच नावीन्यपूर्ण कलाविष्कार, अॅडमॅडशोचे विनोदी नाटकी पद्धतीने सादरीकरण होणार असून, ते कार्यक्रमाचे आकर्षण ठरणार आहे. ‘सखी सम्राज्ञी’ ची अंतिमफेरी या दरम्यान सखी सम्राज्ञी २०१४ ची अंतिम फेरीही रंगणार आहे. दु. ४ वाजता सहकार सभागृह, स्टेशन रोड, अहमदनगर येथे होणार्या सखी महोत्सवात समूह रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, समूहगीत गायन, फॅन्सी ड्रेस, ब्रायडल मेकअप, सोलो डान्स व रेसीपी स्पर्धा (तिखट व्हेज स्नॅक) आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. संपर्काकरिता ९८५०२६४२०० या क्रमांकावर संपर्क करावा.
आज महिलांसाठी ‘सखी महोत्सव’
By admin | Updated: March 18, 2024 16:27 IST