शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांचा आज मोर्चा

By admin | Updated: July 18, 2016 00:54 IST

अहमदनगर: कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृणपणे खून केल्याच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले आहेत़

अहमदनगर: कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृणपणे खून केल्याच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले आहेत़ या घटनेने जिल्हाभर संतापाची लाट उसळली असून, सोमवारी संभाजी बिग्रेडसह जिल्ह्यातील विविध संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध केला जाणार आहे़ दरम्यान विधानसभेतही या प्रकरणाचे पडसाद उमटणार असल्याने जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे़कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात नववीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार करून खून केल्याची घटना घडली़ अत्यंत क्रूरपणे अल्पवयीन मुलीचा खून करण्यात आल्याने या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले आहेत़ सुरुवातीला कर्जत व जामखेड येथील जमावाने बंद पाळून संताप व्यक्त केला़ त्यानंतर दुसऱ्या दिवशी जिल्हाभर ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला़ रस्ता रोको करून वाहतूक अडविण्यात आली़ प्रशासनाच्या आश्वासनानंतर शिवप्रहार संघटनेसह विविध संघटनांनी कर्जत येथे सुरू केलेले आंदोलन मागे घेण्यात आले़ त्याचबरोबर पालकमंत्री तथा जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्यासह राज्यातील आजी- माजी मंत्र्यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन नातेवाईकांना धीर दिला़ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपराव वळसे पाटील यांनी कोपर्डीत येऊन कुटुंबीयांची भेट घेतली़ विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सोमवारपासून सुरू होत असलेल्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे जाहीर केले आहे़ भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनंतर सेनेच्या मंत्र्यांनीही रविवारी नगर गाठले़ रविवारी सायंकाळी शिवसेनेचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी कुटुंबीयांची भेट घेतली़ राजकीय पक्षांसह जिल्ह्यातील विविध संघटनांनी जिल्हाभर ठिकठिकाणी बंद पाळून या घटनेचा निषेध केला असून, सोमवारी विविध संघटना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत़ जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येणार आहे़ मोर्चात संभाजी ब्रिग्रेड, शिवसंग्राम, शंभूक्रांती, स्वाभिमानी संघटना, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, छावा, बुलंद छावा, भूमिपुत्र शेतकरी संघटना, शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत, अशी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे़ जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे़ मोर्चाने जावून तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले़ जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणाऱ्या मोर्चात जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुलेही उपस्थित राहणार असून, तालुक्यात तालुका पदाधिकारी सोमवारी आंदोलन करणार असल्याचे समजते़ (प्रतिनिधी)शिवसेना, राष्ट्रवादीचा मोर्चाकर्जत तालुक्यातील घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे़ मार्केटयार्ड येथून निघून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे संदेश कार्ले यांनी दिली़४घटनेच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे़ आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी भवन येथून हा मोर्चा निघणार आहे़ मोर्चाने जावून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे आ़ जगताप यांनी सांगितले़