शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डीचा आज निकाल, नराधमांना फाशी की जन्मठेप?, संजीव भोर यांच्यासह संघटनेच्या लोकांना न्यायालयात जाण्यापासून राखेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 10:57 IST

कोपर्डी (ता़ कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्यातील तिघा दोषी नराधमांना जन्मठेप मिळते की फाशी, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात आलेल्या शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर व कार्यकर्त्यांना पोलिसांनी गेटवरच अडविले.

अहमदनगर : कोपर्डी (ता़ कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याचा बुधवारी जिल्हा न्यायालयात निकाल लागणार असून, तिघा दोषी नराधमांना जन्मठेप मिळते की फाशी, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात आलेल्या शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर व कार्यकर्त्यांना पोलिसांनी गेटवरच अडविले.न्यायालयात जाण्यापासून पोलिसांनी रोखल्यानंतर शिवप्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांसोबत वाद झाला़ फिर्यादीने मला न्यायालयात सोडू नका, पण संजीव भोर यांना सोडा, अशी विनंती पोलिसांना केली़ त्यानंतर पोलिसांनी संजीव भोर यांना न्यायालयात सोडले.दरम्यान न्यायालयाच्या मुख्य इमारतीमध्ये जाण्यासाठी दोन दरवाजापैकी एक दरवाजा बंद करण्यात आला आहे़ पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा हे न्यायालयात उपस्थित राहून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आहेत.खटल्यातील तीन्ही दोषींना न्यायालयात मोठ्या बंदोबस्तात आणण्यात आले़ कोपर्डी खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कोपर्डीत शुकशुकाट पसरला आहे. गावकरी निकाल ऐकण्यासाठी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय परिसरात दाखल झाले आहेत.जितेंद्र शिंदे (२५), संतोष भवाळ (३०) व नितीन भैलुमे (२६) यांच्यावर खून करणे व छेडछाड करणे तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दोष सिद्ध झाला आहे. त्याअन्वये फाशी अथवा जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे़ बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kopardi caseकोपर्डी खटलाAhmednagarअहमदनगरCourtन्यायालय