शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यात आज कोरोनाचे नवीन ११ रुग्ण, एकट्या अकोले तालुक्यात सहा रुग्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 16:47 IST

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे मंगळवारी ११ नवे रुग्ण आढळून आले. त्यामध्ये अकोले तालुक्यात सर्वाधिक सहा रुग्ण आढळून आले आहेत. इतर रुग्ण संगमनेर, नगर, श्रीगोंदा आणि राहाता तालुक्यातील आहेत. 

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचे मंगळवारी ११ नवे रुग्ण आढळून आले. त्यामध्ये अकोले तालुक्यात सर्वाधिक सहा रुग्ण आढळून आले आहेत. इतर रुग्ण संगमनेर, नगर, श्रीगोंदा आणि राहाता तालुक्यातील आहेत. 

   मंगळवारी आणखी पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील १,  संगमनेर येथील एक, मसने फाटा पारनेर येथील एक आणि नगर तालुक्यातील २ अशा एकूण पाच रुग्णांना बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ७८ एवढी झाली आहे. 

  नगर जिल्ह्यात आणखी ११ नवीन रुग्ण तर ४० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आहेत. अकोले  तालुक्यात सहा रुग्ण आढळून आले. त्यामध्ये जवळे येथील ४८ आणि २४ वर्षीय महिला आणि २८ वर्षीय पुरुष बाधित. वाघापूर येथील ३२ आणि ४० वर्षीय महिला आणि ४५ वर्षीय पुरुष बाधित आढळून आला आहे. सर्व बाधित यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत. 

   संगमनेर तालुक्यात दोन जण आढळून आले आहेत. डिग्रज, मालुंजा येथील २१ आणि ४५ वर्षीय महिला बाधित झाली आहे. श्रीगोंदा तालुक्यात कांडेगाव येथील ७५ वर्षीय महिला बाधित आढळून आली आहे. लोणी (ता. राहाता) येथील ५६ वर्षीय व्यक्ती बाधित आढळून आली आहे. नगर शहरात रेल्वे स्टेशन रोडवरील ३३ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १६३ एवढी झाली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या