शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दारु दुकाने उघडण्याच्या निर्णयावर टीकास्त्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 20:29 IST

अहमदनगर:  नागपूर आणि औरंगाबादमध्ये अधिकाºयांची स्वत:हून दारुची दुकाने न उघडण्याचा निर्णय घेतला. अशीच भूमिका अहमदनगरच्या जिल्हाधिकाºयांनी का घेतली नाही? दारु ही एवढी जीवनावश्यक बाब आहे का? अशी टीका नगर जिल्ह्यातून सुरु झाली आहे. 

अहमदनगर:  नागपूर आणि औरंगाबादमध्ये अधिकाºयांची स्वत:हून दारुची दुकाने न उघडण्याचा निर्णय घेतला. अशीच भूमिका अहमदनगरच्या जिल्हाधिकाºयांनी का घेतली नाही? दारु ही एवढी जीवनावश्यक बाब आहे का? अशी टीका नगर जिल्ह्यातून सुरु झाली आहे. अहमदनगरच्या जिल्हाधिकाºयांनी मंगळवारपासून दारुची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्ह्यातील नागरिकांनी नाराजी व्यक्त करत हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. दारुबंदी आंदोलनातील सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी ‘लोकमत’शी बोलतना म्हणाले, ‘नगर जिल्हा आॅरेंजमधून रेडझोनमध्ये न्यायला दारु दुकानांतील गर्दी कारणीभूत ठरेल. प्रशासनाला हा निर्णय घेण्याची एवढी घाई का झाली आहे. नागपूरसारख्या ठिकाणी तेथील आयुक्तांनी दारुची दुकाने उघडू दिली नाहीत. नगरलाच अशी काय आणीबाणी आली होती? ’राष्टÑ सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठल बुलबुले यांनीही या निर्णयाला विरोध व्यक्त केला आहे. ‘कोरोनाला अटकाव करण्यासाठी शाळा, प्रार्थनास्थळे, व्यापार बंद आहे. मात्र, केवळ महसूल मिळतो म्हणून दारु दुकाने सुरु करणे अयोग्य आहे’, असे ते म्हणाले. माहिती अधिकारी कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनीही प्रशासनावर टीका केली आहे. ते म्हणाले, ‘जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारु विक्री सुरु आहे. तेथे प्रशासन कारवाई करत नाही. एक पूर्ण स्पिरीटच्या टँकर पकडला त्याचाही तपास उत्पादन शुल्क विभाग लावत नाही. उलट दारुची दुकाने सुरु करण्याची प्रचंड घाई केली गेली. हॉटस्पॉट जेथे आहे तेथे लोकांना औषधे देखील मिळत नव्हती. आता दारु मात्र मुबलक मिळणार. हा विरोधाभास आहे. प्रशासनाने चुकीचा निर्णय घेतला आहे.’ ------------परवानाधारक व्यक्तींनाच दारु उपलब्ध व्हावीकोपरगाव : सरकारने दारू दुकाने खुली करण्याचा निर्णय घेतला असला तरी दारू पिण्याचा परवानाधारक व्यक्तींनाच दारू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. नितीन पोळ यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. दीड महिन्यापासून दारू दुकाने बंद असल्यामुळे बºयाच अनुचित प्रकारांना आळा बसला आहे. असे असताना दारूची दुकाने सुरू केल्याने अनुचित प्रकार वाढून पोलीस प्रशासनावर ताण पडणार आहे. ज्यांच्याकडे थोडेफार पैसे शिल्लक आहे, ते दारू विकत घेतील मात्र ज्यांच्याकडे पैसे नाहीत, असे मद्यपी दारू खरेदी करण्याकरिता कोणतेही अनुचित प्रकार करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. एवढे करूनही सरकारला दारू दुकाने सुरू करावी असे वाटत असेल तर ज्यांच्याकडे दारू पिण्याचा परवाना आहे. अशा व्यक्तींना आधार लिंक केल्या शिवाय दारू उपलब्ध करू नये, असे निवेदनात म्हटले आहे.ं