शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

नगरसेवकांचा ठिय्या,घेराव

By admin | Updated: May 6, 2016 23:23 IST

ज्येष्ठ नेते अरुण लांडे यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव नगरपरिषदेचे पदाधिकारी व सदस्यांनी शुक्रवारी खंडोबामाळ जलशुद्धीकरण प्रकल्पावर ठाण मांडून प्र्रकल्पाचे कामकाज काहीकाळ बंद पाडले

शेवगाव : शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ नेते अरुण लांडे यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव नगरपरिषदेचे पदाधिकारी व सदस्यांनी शुक्रवारी खंडोबामाळ जलशुद्धीकरण प्रकल्पावर ठाण मांडून प्र्रकल्पाचे कामकाज काहीकाळ बंद पाडले.चर्चेसाठी आलेल्या ‘जिपलपा’ च्या सहायक अभियंत्यांनाही घेराव घालून त्यांना धारेवर धरले. येत्या दोन दिवसात शहराचा पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार नगरसेवकांनी जाहीर केला. शेवगाव शहरासह प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या ५४ गावांना जायकवाडी बॅक वॉटरमधून पाणी पुरवठा होतो. दुष्काळाची तीव्रता वाढल्याने चराची रुंदी वाढवून जॅकवेलपर्यंत पाणी आणण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. मात्र, चराला अनेक ठिकाणी चढ-उतार असल्याने व लेव्हल नसल्याने जॅकवेलपर्यंत पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही. सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी २४० अश्वशक्तीच्या २ मोटारींची आवश्यकता असताना गेल्या २ वर्षांपासून एकाच जुन्या मोटारीद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. जॅकवेलवर पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन पोल उभारण्यात आले असून त्यावर वीज कनेक्शन जोडण्यात आलेले नाही. मागील महिन्यात उपाययोजना हाती घेण्याची गरज असताना आता तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार सहन करण्यापलीकडचा असल्याची टीका नगरसेवकांनी केली. आंदोलनात कृष्णा ढोरकुले, साईनाथ आधाट, विनोद मोहिते, अशोक आहुजा, अरुण मुंडे, दिगंबर काथवटे, नितीन दहिवाळकर, कैलास तिजोरे, विकास फलके, वजीर पठाण, अंकुश कुसुळकर, सागर फडके, अजय भारस्कर, नंदकिशोर सारडा, महेश फलके आदींसह सर्व नगरसेवक सहभागी झाले. (तालुका प्रतिनिधी)नगरसेवक आक्रमकनगरसेवकांच्या आंदोलनामुळे टँकरचे पाणी भरण्याचे कामही काही वेळ रेंगाळले. शेवगाव पंचायत समितीच्या ‘जिपलपा’ विभागाचे सहायक अभियंता सोपान घुले यांनी आंदोलनस्थळी येवून नगरसेवकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नगरसेवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी खंडोबा माळ जलशुद्धीकरण प्रकल्पावरून माहिती घेतली असता ६ नव्हे तर केवळ ४ मोटारी सुरू असल्याचे व मोटारी जोडण्याचे काम सुरू असल्याने जलशुद्धीकरण प्रकल्पावरील वीज पुरवठा बंद असल्याने दिसून आले. तसेच केंद्रावरील वीज पुरवठा रोज दीर्घकाळ बंद राहत असल्याने आपोआपच शहराला कमी प्रमाणात पाणी मिळत असल्याची वस्तुस्थिती दिसून आल्याने संतप्त नगरसेवकांनी जलशुद्धीकरण केंद्राच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले.