शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

धरणे तहानली !

By admin | Updated: August 5, 2014 23:58 IST

अहमदनगर : ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून - जून, जुलै हे पावसाचे दोन महिने उलटूनही पाऊस नसल्याने धरणांमधील पाणीपातळी चिंताजनक आहे.

अहमदनगर : ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून - जून, जुलै हे पावसाचे दोन महिने उलटूनही पाऊस नसल्याने धरणांमधील पाणीपातळी चिंताजनक आहे. शेवगाव तालुक्याची जीवनरेखा असलेल्या जायकवाडी जलाशयात सध्या अवघा नऊ टक्के, कर्जत तालुक्यातील सीना धरण कोरठे ठाक आहे तर पारनेर तालुक्यातील मांडओहोळ धरणात नवीन पाण्याची आवक झालेली नाही. त्यामुळे धरणपाणलोट क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. सीना धरणात अल्पपाणी साठा असल्याने या धरणावरुन ज्या पाणी योजनांंना पाणी पुरवठा होतो त्या योजनांचे भवितव्य धोक्यात आले आहे. मिरजगाव : पावसाअभावी सीना धरणातील पाणी पातळी चिंताजनक आहे. त्यामुळे या धरणावरुन पाणी पुरवठा करणाऱ्या योजनाही संकटात आहेत.पावसाची जून,जुलै हे महिने कोरडे गेले. पाण्याची नवीन आवक न झाल्याने धरणातील पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. धरणात सध्या २४ दशलक्ष घनफूट एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. धरणामधून मिरजगावसह सतरा गाव पाणी योजनांना पाणी पुरवठा होतो. दोन वर्षापासून सतरा गाव पाणी योजना पाण्याअभावी बंद आहे. धरणातील अत्यल्प पाणीसाठ्यामुळे मिरजगाव पाणी योजनेला पाणी टंचाईशी सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. कुकडी धरण पाणलोटक्षेत्रात सध्या समाधानकारक पाऊस पडत असल्याने या धरणाच्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून सीना धरणात २ हजार १०० दशलक्ष घनफूट पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे. याआधी २८ एप्रिल २०१४ च्या कुकडी आवर्तनातून ७८.५३ दशलक्ष घनफूट पाणी सीना धरणात सोडण्यात आले. हे पाणी तीन महिने पुरले. (वार्ताहर)जायकवाडीत ९ टक्के पाणीसाठाशेवगाव : तालुक्याची जीवनरेखा ठरलेल्या जायकवाडी जलाशयात सध्या सात हजार क्युसेसने पाण्याची आवक सुरु असून धरणात सध्या ९.४० टक्के पाणीसाठा आहे. पावसाअभावी तालुक्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील २५ गावे व ९७ वाड्या,वस्त्यांना २५ टँकरव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु आहे. तहानलेल्या गावांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. जायकवाडी जलाशयात उपयुक्त पाणीसाठा १.६८ टक्के शिल्लक राहिल्याने शेवगाव, पाथर्डीसह ५४ गावे, बोधेगाव, बालमटाकळीसह आठ गावे, शहरटाकळी व २७ गावे तसेच हातगाव व २४ गावांच्या प्रमुख प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांचा पाणी पुरवठा धोक्यात आल्याने सुमारे अडीच लाखापर्यंत लाभधारकांच्या डोक्यावर पाणी टंचाईची टांगती तलवार आहे. गेल्या दोन दिवसांपासून जायकवाडी जलाशयात सात क्युसेसने पाण्याची आवक सुरु आहे. सध्या जलाशयाचा पाणीसाठा ६.७ दशलक्ष घनमीटरपर्यंत जाऊन पोहोचला आहे. सुमारे ९.४० टक्के धरण भरल्याची माहिती धरणाच्या सूत्रांनी दिली. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे जलाशयातील पाणी पातळी सुमारे चार फुटाने वाढली आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या शेवगाव तालुक्यातील वरील प्रमुख चार प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या सुमारे अडीच लाख लाभधारकांना दिलासा मिळाला आहे.प्रस्ताव धूळ खातसीना धरणाची उंची वाढविण्याविषयीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. धरणाची क्षमता २ हजार १०० दशलक्षघनफूट आहे. चार वर्षापासून हे धरण कोरडे आहे. १७ सप्टेंबर २०११ रोजी हे धरण ओव्हर फ्लो झाले होते. धरणाच्या सांडव्यातून ३ हजार ७१३ दशलक्ष घनफूट पाणी १७ सप्टेंबर २०१० ते २३ डिसेंबर २०१० या चार महिन्यात वाहून गेले. पाणी टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने सीना धरणाखालील पाचशे मीटर अंतरावरील विहीर व इंधन विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. परंतु काही शेतकऱ्यांनी प्रशासनाची दिशाभूल करीत शेतीसाठी या विहिरीतून पाणी उपसा सुरु केला आहे. मांडओहोळ धरणात अत्यल्प पाणीसाठापारनेर : तालुक्यातील टाकळीढोकेश्वरकडील उत्तर भागाला वरदान ठरणाऱ्या मांडओहोळ धरणात सध्या फक्त ६५ दशलक्षघनफूट एवढ्याच पाणी साठयाची आवक झाल्याने पाण्याची चिंता वाढली आहे. ३९९ द.ल.घ.फु.एवढी धरणाची क्षमता आहे. धरण परिसरात व वरील बाजूस यंदा अद्याप चांगला पाऊस झाला नसल्याने पाणी आवक कमी झाली आहे. सध्या पारनेर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने अनेक गावांचे टँकर या धरणाच्या पाण्यातुनच भरले जात आहेत. तालुक्यात आधीच दुष्काळाचे सावट असताना या धरणात चांगला पाणीसाठा न आल्यास पारनेर तालुक्यात पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होईल. ढवळपुरीजवळील काळू धरणात सध्या कमी पाणीसाठा आहे, मात्र मुळा धरणाच्या फुगवट्याचे पाणी आले तरच या तलावात पाणीसाठा येऊ शकतो. मागील दोन दुष्काळात टँकरसाठी काळू प्रकल्पानेच साथ दिली आहे. पारनेर तालुक्यात गेल्यावर्षीही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर चारा टंचाईही गंभीर आहे. यंदाही पावसाची निम्मी नक्षत्रे संपली तरीही पाऊस नसल्याने तालुक्याच्या अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. (तालुका प्रतिनिधी)तिसगाव भागाला आवर्तनाची प्रतीक्षातिसगाव : निम्मा पावसाळा संपूनही पाऊस नसल्याने पाथर्डी तालुक्यातील तिसगाव परिसरातील कासारपिंपळगाव, हनुमान टाकळी, चितळी, पाडळी, साकेगाव, सुसरे भागाला मुळा पाटचारीच्या आवर्तनाची प्रतीक्षा आहे. या गावांच्या ग्रामसभेत नैमित्तीक विषयांबरोबर धोक्यात आलेल्या खरीप हंगामाविषयी चर्चा झाली. आवर्तनाचे ठराव होऊन ते तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात आले असल्याचे पाडळीचे सरपंच अशोक गर्जे यांनी सांगितले. चितळी सेवा संस्थेचे अध्यक्ष ताठे म्हणाले, अपुऱ्या पाण्यावर ठिबक सिंचनाव्दारे पिके घेतली, परंतु ठिबकसाठी अर्धातासही मोटारी चालत नाहीत. कासार पिंपळगाव येथे हीच परिस्थिती असल्याचे मुरलीधर भगत यांनी सांगितले. मांडवे,जोहरवाडी भागातही पाऊस नसल्याने चाऱ्यासह पाण्याचा तुटवडा आहे. येथेही वांबोरी चारी पाईप चारीच्या आवर्तनाचा लढा उभारण्यासाठी छबुराव लवांडे, मधुकर लवांडे व घाटशिरस येथे पोपट चोथे प्रयत्नशील आहेत. (वार्ताहर)प्रशासनाची कारवाईसीना धरणातून शेतीसाठी पाणी उपसा करणारे श्रीगोंदा, नगर, कर्जत,आष्टी भागातील कृषीपंपांवर कारवाई करून त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यातआला.