शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

माथेफिरु ट्रक चालकाच्या थरारक प्रवासाने अनेकांचा रोखला श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 12:05 IST

शेवगाव/नेवासा : एका माथेफिरु ट्रक चालकाने नेवासा ते शेवगाव दरम्यान थरारक प्रवास केला. या प्रवासाने अनेकांना श्वास रोखला होता. पोलिसांनाही त्याने जेरीस आणले. कितीही अडथळे आणले तरी त्याने ते तोडत आपला शेवगावपर्यंत प्रवास पूर्ण केला. त्याच्यामागे जवळपास पन्नास पोलीस मागे धवतच राहिले. अखेर या ट्रकचालकाने शेवगाव येथील एका दुकानाला जोराची धडक दिली आणि लोकांचा जीव भांड्यात पडला. त्याला पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले.

अनिल साठे/सुहास पठाडेशेवगाव/नेवासा : एका माथेफिरु ट्रक चालकाने नेवासा ते शेवगाव दरम्यान थरारक प्रवास केला. या प्रवासाने अनेकांना श्वास रोखला होता. पोलिसांनाही त्याने जेरीस आणले. कितीही अडथळे आणले तरी त्याने ते तोडत आपला शेवगावपर्यंत प्रवास पूर्ण केला. त्याच्यामागे जवळपास पन्नास पोलीस मागे धवतच राहिले. अखेर या ट्रकचालकाने शेवगाव येथील एका दुकानाला जोराची धडक दिली आणि लोकांचा जीव भांड्यात पडला. त्याला पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले.सिनेमातल्या सिन प्रमाणे हा थरार नेवासा, शेवगावकरांनी मंगळवारी रात्री पाहिला मिळाला आहे. टाकळीभान येथे लक्झरी बसला हुलकावणी देत बेफान वेगाने नेवासाच्या दिशेने निघाला. या वेगवान ट्रक बद्दल सोशल मीडियावर मेसेज फिरताच नेवासा पोलिसांनी गणपती मंदिराजवळ नाका बंदी केली. त्याला अडवण्यासाठी उभा असलेल्या पोलिसांच्या अंगावर ट्रक घालण्याचा त्याने प्रयत्न केला. त्याने एस कॉर्नर,नेवासा बुद्रुक येथे येणाया-जाणाºया अनेकांना हुलकावणी दिली. नेवासा येथील नाका बंदी तोडत निघालेला ट्रकच्या मागे त्याला पकडण्यासाठी तब्बल पोलिसांनी सुमारे दहा मोटार सायकल,तीन जीप सह पन्नासहून अधिक नागरिक, पत्रकारांनी त्याचा पाठलाग केला. हा ट्रक शेवगावच्या दिशेने येत असल्याचे शेवगाव पोलिसांना कळवण्यात आले. त्यांनी ही प्रसंगावधान राखत तात्काळ नाकाबंदी केली. शेवगावच्या दिशेने येताना भेंडा, कुकाणा येथे रस्त्यावर हातगाडे लावत पोलीसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने वाहनाचा वेग न आवरता सर्व अडथळे तोडत शेवगाव गाठले.याच दरम्यान एका गुन्ह्याचा तपासकामी मिरी येथे गेलेले उप विभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी ही त्या ट्रकचा पाठलाग सुरु केला. मात्र माथेफिरु ट्रक चालकाने ट्रक कुठेच न थांबवता शेवगाव शहरातील क्रांती चौकातील एक मोबाईलच्या दुकानाला जोराची धडक दिली. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र त्या दुकानाचे नुकसान झाले आहे. शेवगाव पोलिसांनी त्यास रोखण्यासाठी रस्त्यात अडथळे उभा केले होते. सदरच्या ट्रकचा चालकाच्या बाजूचा पुढील टायर कुकाणा फुटला. तरीही त्याने न थांबता गाडी चालवली. अखेर या थरारक प्रवास कोणतीही जीवित हानी न होता थांबला.