जामखेड : खर्डा येथील आठवडे बाजारात भाजीपाला खरेदीसाठी आज दुपारी एक वाजता पांढरेवाडी येथील कमलाबाई सुदाम गिते (वय ६५) यांना पाच तोळ््याला फसविले.गिते वेशीजवळ असताना तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांना सोन्याचे बिस्कीट आमच्याकडे आहे. ते तुम्हाला घ्या व तुमच्या जवळील सोने आम्हाला द्या असे म्हणाले असता वयोवृद्ध महिलेने गळ्यातील सोन्याची बोरमाळ, बदाम पत्ते, कानातील कर्णफुले असा चार तोळे सोने घेऊन पसार झाले. अर्ध्या तासाने सदर महीलेचा मुलगा बिभीषण भेटला असता तिने अज्ञात चोरट्यांनी दिलेले सोन्याचे बिस्कीट दिले. बिभीषणने सदर बिस्कीटाची खात्री केली असता ते पितळी निघाले. सदर वयोवृद्ध महीलेचा अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे बिस्कीट दाखवून फसवले आहे.
खर्डा बाजारात वयोवृद्ध महिलेला पाच तोळे सोन्याला घातला तीन जणांनी गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 15:53 IST