...........
चाकूच्या धाकाने पैसे लुटले
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील आगासखांड येथे दोघांनी घरात घुसून पती-पत्नीला चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील दोन हजार रुपये हिसकावून नेले. २८ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात राधाबाई शेषराव कराड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश ऊर्फ दिनेश शिवनाथ भाबड व उद्धव वसंत भाबड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक डांगे हे पुढील तपास करत आहेत.
........
मोटारसायकल चोरली
अहमदनगर : पारनेर शहरातील संभाजीनगर येथून राहत्या घरासमोरून चोरट्यांनी २५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरून नेली. २२ ते २३ एप्रिलदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी नीलेश देवराम दरेकर यांनी पारनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक फौजदार रोकडे हे पुढील तपास करत आहेत.
........
ट्रॅक्टर चोरला
अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथून चोरट्यांनी शेतकऱ्याच्या शेडमधून १ लाख ७० हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर चोरून नेला. २७ ते २८ एप्रिलदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात धनंजय वसंत थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक दातीर हे पुढील तपास करत आहेत.
........