शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

एटीएममधून पैसे लंपास करणारे तिघेजण पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 10:44 IST

स्टेट बँक आॅफ इंडियाच्या नगर शहरातील मुख्य शाखेजवळ असलेल्या एटीएममध्ये चोरट्यांनी तांत्रिक बिघाड करून तब्बल १८ लाख ९२ हजार ५०० रुपये लंपास केले होते.

अहमदनगर : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या नगर शहरातील मुख्य शाखेजवळ असलेल्या एटीएममध्ये चोरट्यांनी तांत्रिक बिघाड करून तब्बल १८ लाख ९२ हजार ५०० रुपये लंपास केले होते. याबाबत आठवडाभरापूर्वी बँकेकडून फिर्याद दाखल झाली होती. पोलिसांनी गतीने चक्रे फिरवून याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे.स्टेट बँक आॅफ इंडियाच्या नगर शहरातील मुख्य शाखेजवळ असलेल्या एटीएममध्ये चोरट्यांनी तांत्रिक बिघाड करून तब्बल १८ लाख ९२ हजार ५०० रुपये लंपास केले होते. ५ एप्रिल ते २२ मे च्या दरम्यान ही घटना घडली होती. याप्रकरणी बँकेचे सहायक महाप्रबंधक मेघाशाम मारोतराव ईजेवार यांनी मंगळवारी (दि़२) भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. एटीएममध्ये पैसे चोरणाऱ्या चोरट्यांनी बँकेच्या आॅनलाईन तक्रार वेबसाईटवर जाऊन पैसे न मिळाल्याबाबत तक्रार करून नुकसान भरपाईचीही मागणी केली होती़ पैसे गेल्यानंतर बँक अधिकाऱ्यांच्या ही चोरी निदर्शनास आली़याबाबत भिंगार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकरसिंह राजपूत यांनी तपासाची चक्रे फिरवून आठवडाभरात आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार विरेंद्र आयोध्याप्रसाद यादव (वय २७, उत्तरप्रदेश), पवन पुंडलिकराव जिवरख (वय २३, औरंगाबाद) व श्वेता कमलेश सिंग (वय २५, कांदिवली, मुंबई) या तिघांना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून न्यायालयाने त्यांना १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींसोबत आणखी उत्तरप्रदेश येथील साथीदार असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस