अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या रिक्त असलेल्या जागांवर काँग्रेस व राष्ट्रवादी आणि सत्ताधारी शिवसेनेच्या दोन नगरसेवकांची निवड करण्यात आली. महापालिकेच्या स्थायी समितीच्या रिक्त नऊ जागांवर सदस्य निवडण्यासाठी महापालिकेच्या आज सकाळी ११.३० वाजता विशेष सभा घेण्यात आली.यामध्ये सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक योगीराज गाडे, दीपाली बारस्कर यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादीच्या बाळासाहेब बोराटे, कलावती शेळके, विजय गव्हाळे, कुरेशी ख्वाजाबी यांची निवड झाली आहे. तर काँग्रेसचे मुद्दसर शेख, संजय लोंढे, डॉ. सागर बोरूडे यांना स्थायीमध्ये संधी देण्यात आली आहे. महापालिकेत महापौर शिवसेनेचा, उपमहापौर भाजपचा, स्थायी समितीचा सभापती शिवसेनेचा असे सूत्र आहे. त्यात श्रीपाद छिंदम प्रकरणानंतर भाजपने नाकारलेले उपमहापौरपद शिवसेनेला मिळाले आहे. रिक्त नऊ जागांवर भाजपाला एकही जागा मिळालेली नाही.
अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी काँग्रेसच्या तीन, राष्ट्रवादीच्या चार तर शिवसेनेच्या दोन नगरसेवकांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 12:19 IST
महापालिकेच्या स्थायी समितीच्या रिक्त असलेल्या जागांवर काँग्रेस व राष्ट्रवादी आणि सत्ताधारी शिवसेनेच्या दोन नगरसेवकांची निवड करण्यात आली. महापालिकेच्या स्थायी समितीच्या रिक्त नऊ जागांवर सदस्य निवडण्यासाठी महापालिकेच्या आज सकाळी ११.३० वाजता विशेष सभा घेण्यात आली.
अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी काँग्रेसच्या तीन, राष्ट्रवादीच्या चार तर शिवसेनेच्या दोन नगरसेवकांची निवड
ठळक मुद्दे भाजपाला एकही जागा मिळालेली नाही.