शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपूरच्या कुख्यात तिघा दरोडेखोरांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 22:17 IST

अहमदनगर : दरोडा, खून, रस्तालूट अशा गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या तिघा अट्टल दरोडेखोरांना रविवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई, पुणे व अकलूज परिसरात छापा टाकून गजाआड केले़ या तिघांवर मोक्कातंर्गत कारवाई झालेली आहे़

श्रीरामपूर/अहमदनगर : दरोडा, खून, रस्तालूट अशा गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या तिघा अट्टल दरोडेखोरांना रविवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई, पुणे व अकलूज परिसरात छापा टाकून गजाआड केले. या तिघांवर मोक्कातंर्गत कारवाई झालेली आहे.निलेश बाळासाहेब परदेशी (वय २७), विक्रम उर्फ विकी नारायणश्री परदेशी (वय २८) व भक्ती उर्फ भगत भागवत काळे (वय २८, तिघेही रा. खैैरीनिमगाव, ता.श्रीरामपूर) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत़ निलेश परदेशी याने श्रीरामपूरजवळील एका गावातील अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते. पोलिसांनी सदर मुलीची आरोपीच्या तावडीतून सुटका केली असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.आरोपी निलेश परदेशी व विक्रम परदेशी हे मुंबई परिसरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती़ पवार यांच्यासह पथकाने नालासोपारा परिसरात सापळा लावून निलेश व विक्रम यांना ताब्यात घेतले़ तिसरा आरोपी भक्ती उर्फ भगत काळे याला अकलूज (जि़ सोलापूर) येथून शिताफीने ताब्यात घेतले. या तिघा आरोपींनी नारायणगाव, लोणावळा व नवी मुंबई येथील सिगारेटचे कंटेनर लुटले होते़ यातून त्यांनी कोट्यवधी रूपये कमावले होते. या गुन्ह्यात नवी मुंबई पोलीस आरोपींचा शोध घेत होते़ हे आरोपी मात्र गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होते़ सदर मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत पथवे आदी उपस्थित होते. आरोपींना पकडण्याची कारवाई पवार यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक निरीक्षक डॉ़ शरद गोर्र्डे, कॉन्स्टेबल योगेश गोसावी, मन्सूर सय्यद, उमेश खेडकर, नानेकर, रवींद्र कर्डिले, शंकर चौधरी आदींच्या पथकाने केली. दरम्यान अल्पवयीन मुलीची सुटका केल्याने त्या गावातील ग्रामस्थांनी पोलिसांचा सत्कार केला.श्रीरामपुरातील गुन्हेगारीचा सफायाआरोपी निलेश साबळे परदेशी याच्यावर श्रीरामपूरसह लोणावळा व नवी मुंबई पोलीस ठाण्यात ११ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. विक्रम परदेशी व भक्ती काळे यांच्यावरही श्रीरामपूरसह शिर्डी पोलीस ठाण्यात प्रत्येकी दहा ते अकरा गुन्हे दाखल आहेत. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस