शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नेवासा तालुक्यातील घोगरगाव शिवारात तीन दरोडेखोरांना अटक, दोघे पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 20:10 IST

तालुक्यातील घोगरगाव शिवारात घुमनदेव ते जुने घोगरगाव या दरम्यान दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन दरोडेखोरांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले तर दोन जण पसार झाले.

नेवासा : तालुक्यातील घोगरगाव शिवारात घुमनदेव ते जुने घोगरगाव या दरम्यान दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन दरोडेखोरांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले तर दोन जण पसार झाले. दरोडेखोरांकडून लोखंडी गज, लाकडी काठी, मिरची पूड व मोटारसायकल जप्त करण्यात आली. सर्जेराव पंढरीनाथ प-हाड (वय-४०), विकास सर्जेराव प-हाड (वय-१९), शिवनाथ ज्ञानदेव आव्हाड (वय-२५) (सर्व राहणार घोगरगाव ता. नेवासा) यांना अटक केली असून त्यांच्याकडून लोखंडी गज, लाकडी काठी, मिरची पूड तसेच एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. तर विजय सुखदेव फुलारी (रा. घोगरगाव ता. नेवासा) व फयाज इनामदार (रा. टाकळीभान ता. श्रीरामपूर) हे दोघे फरार झाले आहेत.        पोलीस नाईक जयवंत तोडमल यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सोमवारी रात्री गस्त व आॅल आऊट स्कीम सुरू असताना पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, पोलीस रेवणनाथ मरकड, चालक कु-हाडे सरकारी वाहनातून नेवासा परिसरात गस्त घालत असतांना घोगरगाव गावच्या शिवारात घुमनदेव ते जुने घोगरगाव रस्त्यालगत असलेल्या बशीरभाई यांच्या विटभट्टीजवळ चार ते पाच जण इसम हातात गज व काठ्या घेऊन चोरी करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेले आहेत अशी माहिती मिळली. त्यानंतर घोगरगाव शिवारात बशीरभाई विटभट्टीच्या जवळ पुलाच्या कठड्यावर पाच जण तोंडाला रुमाल लावून हातात काठी घेऊन मोटारसायकल सह लपून बसलेले आढळून आल्यानंतर जागेवर पकडले. मात्र त्यातील दोन जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पाच जणांविरुद्ध नेवासा पोलीस स्टेशनला भा. द. वि. कलम ३९९, ४०२  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा