कोपरगाव : शेतातील गव्हाच्या पेंढ्या का घेऊन चाललात असे विचारल्याच्या रागातून चौघांनी मिळून तिघांना लाथाबुक्क्यांनी, बांबूने मारहाण करून जखमी केले. ही घटना कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रूक येथे बुधवारी (दि. १४) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. या मारहाणीत दगडू विठ्ठल गवळी, प्रवीण दगडू गवळी, सचिन दगडू गवळी हे जखमी झाले आहेत.
या प्रकरणी दगडू विठ्ठल गवळी (रा. मढी बुद्रूक, ता. कोपरगाव ) याच्या फिर्यादीवरून बाळू विठ्ठल गवळी, गणेश बाळू गवळी, निलेश बाळू गवळी, बापू बाळू गवळी (सर्व रा .मढी बुद्रूक ता. कोपरगाव ) यांच्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुरवारी (दि. १५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.