हळगाव : जामखेड तालुक्यातील हळगावसह परिसरातील गावांमध्ये रात्री आठच्या सुमारास वादळी वा-यासह आलेल्या जोरदार पावसाने दाणादाण उडाली. जामखेड तालुक्यातील आघी आणि हळगाव या दोन गावांमधील चारा छावण्यांमध्ये वीज कोसळून तीन जनावरे दगावल्याची दुदैर्वी घटना आज सायंकाळी घडली. सायंकाळी आठे ते पाऊणे नऊ या वेळत हळगाव परिसरासह अनेक गावांमध्ये जोरदार वादळी वा-यासह पाऊस झाला.सुमारे अर्धा तास विजांचा कडकडाट सुरू होता. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे चारा छावण्यांचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. छावण्यातील जनावरे व शेतकर्यांचे वादळामुळे मोठे हाल झाले. परिसरातील हळगाव, पिंपरखेड, चौंडी, आघी,जवळा, बावी, फक्राबाद सह तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
हळगाव परिसरात वीज पडून तीन जनावरे दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 13:23 IST