शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीनशे कोटींची वाळू , महसूल मिळाला ४३ कोटी पाच वर्षांतील स्थिती : दोन वर्षांपासून वाळूचे लिलावच नाहीत, वाळूतस्करांची चांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 17:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : वाळू लिलावातून जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत भक्कम भर पडते. मात्र गेल्या काही वर्षांत या महसुलावर जिल्हा प्रशासनाला पाणी सोडावे लागले आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्हा प्रशासनाने ३५६ कोटींची वाळू लिलावासाठी ठेवली. मात्र त्यातील केवळ ४३ कोटींचीच वाळू ठेकेदारांनी लिलावात घेतली. जी वाळू लिलावात विकली नाही, ती अद्याप शिल्लक आहे की वाळूतस्करांनी पळवली? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : वाळू लिलावातून जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत भक्कम भर पडते. मात्र गेल्या काही वर्षांत या महसुलावर जिल्हा प्रशासनाला पाणी सोडावे लागले आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्हा प्रशासनाने ३५६ कोटींची वाळू लिलावासाठी ठेवली. मात्र त्यातील केवळ ४३ कोटींचीच वाळू ठेकेदारांनी लिलावात घेतली. जी वाळू लिलावात विकली नाही, ती अद्याप शिल्लक आहे की वाळूतस्करांनी पळवली? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.जिल्ह्यातून वाहणाºया गोदावरी, प्रवरा, मुळा, भीमा या मोठ्या नद्यांना मुबलक वाळू उपलब्ध असल्याने या वाळूच्या लिलावातून गौण खनिज विभागाला मोठा महसूल मिळतो. या वाळूच्या विक्रीतूनच गौण खनिजचे वार्षिक उद्दिष्ट पूर्ण होते. गेल्या पाच वर्षांत जिल्हा प्रशासनाने तब्बल ३७८ वाळूस्थळ लिलावासाठी उपलब्ध करून दिले. त्याची सरकारी किंमत ३५६ कोटी ५२ लाख रूपये होती. परंतु यातील केवळ ७२ वाळूस्थळांचीच लिलावात विक्री झाली. त्यातून अवघे ४३ कोटी ३२ लाख रूपये प्रशासनाच्या पदरात पडले. उर्वरित ३१३ कोटींच्या वाळूकडे ठेकेदारांनी पाठ फिरवली. २०१४-१५ या वर्षी गौण खनिज विभागाने १७८ वाळूठेक्यांसाठी लिलाव ठेवून त्याची सरकारी किंमत ७८ कोटी ३२ लाख रूपये ठेवली. त्यातील २५ ठेक्यांचा लिलाव होऊन १३ कोटी ५५ लाख रूपये महसूल मिळाला. २०१५-१६ मध्ये ६४ वाळू ठेक्यांमधील ६९ कोटी ९३ लाखांची वाळू लिलावासाठी होती. त्यासही अल्प प्रतिसाद मिळून केवळ १७ ठेके विकले गेले व त्यापोटी ७ कोटी ९३ लाखांची रक्कम महसूलला मिळाली. पुढे २०१६-१७ मध्ये ८२ कोटी रूपयांचे ७७ वाळूसाठे लिलावासाठी होते. त्यातही अवघे ८.६६ कोटींचे १८ ठेके विकले गेले. २०१७-१८मध्येही हा प्रतिसाद कमीच राहिला. ११७ कोटींचे ४५     ठेके लिलावासाठी होते त्यातही १३ कोटींचे केवळ १२ ठेके विकले गेले. गेल्या चार वर्षांत अशा एकूण ७२ ठेक्यांची विक्री होऊन त्यापोटी ४३ कोटी ३२ लाख रूपये प्रशासनाला जमा झाले.