शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

अण्णांच्या कार्यकर्त्यालाच वाळूतस्करांची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 10:44 IST

नगर जिल्ह्यात बेसुमार वाळूउपसा सुरु असताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी काहीही कारवाई करायला तयार नाहीत. त्यामुळे वाळूतस्करांचे धाडस वाढले असून एका वाळूतस्कराने मंगळवारी थेट ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे कार्यकर्ते अ‍ॅड. शाम आसावा यांना धमकी दिली. ‘लोकमत’ कार्यालयावरही काही वाळूतस्करांनी पाळत ठेवल्याचा प्रकार घडला आहे. ‘लोकमत’ने जिल्हाधिका-यांकडे लेखी तक्रार केल्यानंतरही त्याची दखल घेण्यात आलेली नाही.

ठळक मुद्दे जिल्हाधिकाऱ्यांची बघ्याची भूमिकाआमदार-पालकमंत्री-विरोधी पक्षनेते सर्वांचे मौन

अहमदनगर : नगर जिल्ह्यात बेसुमार वाळूउपसा सुरु असताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी काहीही कारवाई करायला तयार नाहीत. त्यामुळे वाळूतस्करांचे धाडस वाढले असून एका वाळूतस्कराने मंगळवारी थेट ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे कार्यकर्ते अ‍ॅड. शाम आसावा यांना धमकी दिली. ‘लोकमत’ कार्यालयावरही काही वाळूतस्करांनी पाळत ठेवल्याचा प्रकार घडला आहे. ‘लोकमत’ने जिल्हाधिका-यांकडे लेखी तक्रार केल्यानंतरही त्याची दखल घेण्यात आलेली नाही.नगर जिल्ह्यात मार्च महिन्यात वाळूचे लिलाव देण्यात आले आहेत. या लिलावाची अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे व जिल्हा खनिकर्म अधिकारी संजय बामणे यांनी केलेली प्रक्रियाच बेकायदेशीर असल्याची बाब ‘लोकमत’ने निदर्शनास आणली आहे. ही गंभीर बाब असतानाही प्रशासनाकडून काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान, सध्या श्रीरामपूर, राहाता तालुक्यातील हणमंतगाव, संगमनेर तालुक्यातील जोर्वे व ओझर येथे बेसुमार वाळूउपसा सुरु आहे. नदीपात्रात जेसीबी, पोकलेन मशीन लावून उपसा करता येत नाही. तसेच डंपरसारखी वाहनेही नेता येत नाहीत. मात्र हे नियम सर्रास धाब्यावर बसविण्यात आले आहेत. विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रभाव क्षेत्रातहीप्रशासन नियमांची पायमल्ली करत आहे. हणमंतगाव येथील वाळूउपशाबाबत अ‍ॅड. आसावा यांनी जिल्हाधिकारी, खनिकर्म अधिकारी व तहसीलदार यांच्या भ्रमणध्वनीवर माहिती कळवूनही या अधिका-यांनी काहीच दखल घेतली नाही. दरम्यान, हणमंतगाव येथून वाळू उपसा करणाºया ठेकेदाराने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच ‘वाळूच्या तक्रारी करु नका. अन्यथा सगळे मिळून तुला नीट समजून सांगू’ अशी धमकी आसावा यांना दिली आहे. आसावा यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवर ही माहिती जाहीर केली आहे.अलीकडेच राहुरी तालुक्यातील वाळू ठेकेदाराने ‘लोकमत’च्या कार्यालयात येऊन वाळूच्या बातम्या न छापण्याबाबत आवृत्तीप्रमुखांवर दबाव आणला होता. त्याबाबत पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकाºयांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. मात्र, त्यावर काय कारवाई करण्यात आली हे समजू शकले नाही.आसावा हे हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे काम करतात. त्यांना तसेच माध्यमांना धमकावण्याचे दबावतंत्र तस्करांनी सुरु केले आहे. महसूल प्रशासनाची व पोलिसांचीही या ठेकेदारांना छुपी साथ असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.वाळूतस्कर स्थानिक नागरिकांना दहशत दाखवत आहेत. तर काही नागरिकांना आमिष दाखवत आहेत. वाळूउपशामुळे आमच्या शेतीचे नुकसान होत आहे, अशा अनेक तक्रारी शेतकºयांनी आपणाकडे केल्या आहेत. शेतकºयांनी चोरुन व्हिडीओ काढले व आपणाला पाठविले. काही शेतकरी तर अक्षरश: अश्रू ढाळत शेतीचे कसे नुकसान होत आहे याची कहाणी सांगतात. वाळूउपशाचे व्हिडीओ आपण जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी बामणे, तहसीलदार यांना पाठवूनही कारवाई होत नाही. त्यामुळे वाळू तस्करांचे मनोबल व उद्दामपणा वाढला आहे. कारवाईला गेलो पण काहीच आढळले नाही, अशा उलट्या बोंबा प्रशासन मारते. आपणाला यापूर्वीही धमक्या देण्यात आल्या आहेत. त्याबाबत राहुरी पोलीस व पोलीस अधीक्षकांना कळवूनही काहीच कारवाई झालेली नाही. आपले काहीही बरे वाईट झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार असेल.- अ‍ॅड. शाम आसावा, समन्वयक, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलननेत्यांचे मौनवाळूतस्करीबाबत शेतक-यांच्या प्रचंड तक्रारी असतानाही पालकमंत्री राम शिंदे, विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे तसेच जिल्ह्यातील आमदार मौन बाळगून आहेत. कोपरगाव, श्रीरामपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नाशिक जिल्ह्यातील ठेकेदार तस्करी करत असून त्यांनी स्थानिक गुन्हेगारांना हाताशी धरले आहे. तक्रारी करणा-या कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका असतानाही पोलीस तसेच महसूल प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. अ‍ॅड. आसावा यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडेही याबाबत तक्रारी केल्या. मात्र त्यानंतही कारवाई झाली नाही.अण्णांच्या भूमिकेकडे लक्षवाळू तस्करांनी थेट अण्णा हजारे यांचे कार्यकर्ते अ‍ॅड. शाम आसावा यांना धमकी दिली आहे. तसेच, ‘लोकमत’वरही बातम्या न छापण्यासाठी दबाव आणला आहे. असे असतानाही जिल्हाधिकारी कारवाई करायला तयार नाहीत. पोलीस आणि ‘आरटीओ’ प्रशासनही बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे अण्णा हजारे काय भूमिका घेतात ? याबाबत उत्सुकता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाने वाळू लिलावाची जी प्रक्रिया राबवली त्याची कागदपत्रे हजारे यांनी मागवली आहेत.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयanna hazareअण्णा हजारे