शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

भिगवण-अमरापूर मार्गासाठी हजारो वृक्षांची कत्तल; जुनी वृक्षसंपदा नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 15:51 IST

भिगवण-अमरापूर या २५० कोटी रूपये खर्चाच्या रस्त्याचे काम वेगात सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी दुतर्फा असलेल्या कित्येक वर्षापूर्वीच्या झाडांची कत्तल सुरू आहे. या कत्तलीने हजारो जुनी झाडे जमीनदोस्त झाली.

विश्वास रेणुकर । राशीन : भिगवण-अमरापूर या २५० कोटी रूपये खर्चाच्या रस्त्याचे काम वेगात सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी दुतर्फा असलेल्या कित्येक वर्षापूर्वीच्या झाडांची कत्तल सुरू आहे. या कत्तलीने हजारो जुनी झाडे जमीनदोस्त झाली.माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून भिगवण (इंदापूर) - अमरापूर (शेवगाव) रस्त्याचे काम सुरू आहे. सध्या कर्जत तालुक्यात रस्त्याचे काम सुरू आहे. त्या अंतर्गत रस्ता रूंदीकरण, डांबरीकरण, काँक्रिटीकरण होत  आहे.  रस्ता रूंदीकरण सुरू असल्याने दुतर्फा असलेली नवी, जुनी झाडे तोडण्याचे काम सुरू आहे. यासाठी शासनाने निविदा काढून एका ठेकेदाराला झाडे तोडण्याचे कामही दिले आहे. सध्या कर्जत ते राशीन मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे.  राशीन ते खेड या मार्गावर पुलाची कामे सुरू आहेत. दोन्ही मार्गात रूंदीकरणात अडथला ठरणारी झाडे तोडली जात आहेत. त्यामुळे कित्येक वर्षांपासून असलेली जुनी झाडे नामशेष होत आहेत. मार्किंग केलेल्या झांडाची नेमकी संख्या संबंधित विभागाला विचारण्यात आली. मात्र त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे ठेकेदार काही मार्किंग नसलेली झाडेही तोडू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.विकासाच्या धमण्या अशी रस्त्यांची ओळख आहे. चांगल्या रस्त्यांमुळे दळण-वळणाचा प्रश्नही सुटणार असला तरी झाडांची कत्तल झाल्याने होणाºया पर्यावरणाच्या नुकसानीचे काय? असा प्रश्न पर्यावरणप्रेमी उपस्थित करू लागले आहेत. 

रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील १० वर्षांची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी ठेकेदार कंपनीकडे आहे. त्यामुळे अडथळा ठरणा-या तोडलेल्या झाडांच्या बदल्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, ठेकादार जास्तीत जास्त झाडे लावणार आहे, असे कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अ‍े.बी. भोसले यांनी सांगितले.

रस्त्याच्या बाजूची काही झाडे साठ वर्षाहून अधिक जुनी आहेत. काही नवी झाडेही आहेत. त्याची कत्तल सुरू आहे. गावांच्या विकासासाठी झाडे तोडणे गैर नसले तरी त्यानंतर मात्र पुन्हा झाडे लावून त्यांचे संवर्धनही त्या संबंधित विभागाने करायला हवे, असे कर्जत भारतीय जनसंसदचे उपाध्यक्ष जावेद काझी यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जतroad safetyरस्ते सुरक्षा