शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरमधील हजारो गुंतवणूकदारांना ३ कोटींना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 11:32 IST

बीएनपी आणि मैत्रेय या कंपन्यांनी जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याचे उदाहरण ताजे असतानाच रॉयल टिष्ट्वंकल स्टार क्लब (मुंबई) या कंपनीनेही नगरकरांना ३ कोटी १० लाख रूपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.

अहमदनगर : बीएनपी आणि मैत्रेय या कंपन्यांनी जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याचे उदाहरण ताजे असतानाच रॉयल टिष्ट्वंकल स्टार क्लब (मुंबई) या कंपनीनेही नगरकरांना ३ कोटी १० लाख रूपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कंपनीचे कर्मचारी प्रबोध वसंत शिंदीकर (वय ४५ रा़ संगमनेर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांनी कंपनीचे अध्यक्ष ओमप्रकाश वसंतकुमार गोयंका, एन. एस. कोटनीस, प्रोडक्शन डायरेक्टर व्ही. नटराजन, व्यवस्थापन डायरेक्टर प्रकाश उत्तेकर, मिराह ग्रुपचे एम. डी. गौरव गोयंका, उमेश वर्तक व जितू विटलानी (सर्व रा़मुंबई) यांच्याविरोधात फसवणूक व महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संरक्षण कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. रॉयल टिष्ट्वंकल स्टार क्लब लिमिटेड व तिची संयुक्त कंपनी सिट्रस चेक इन सीमीटेड कंपनीचे संगमनेर येथे नगर रोडवर डॉ. सावंत हॉस्पिटलमसोर तर नगर येथे नगर-पुणे रोडवरील अक्षदा गार्डन येथे कार्यालय आहे. या कंपनीने जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून एजंटामार्फत कोट्यवधी रूपयांच्या ठेवी जमा करून घेतल्या़ . शहरासह ग्रामीण भागातील अनेकांनी या कंपनीत पैसे गुंतविले. ठेवीची मुदत संपूनही पैसे मिळत नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. अखेर याच कंपनीत काम करणाऱ्या शिंदीकर यांनी कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला. टिष्ट्वंकल स्टार क्लब कंपनीविरोधात पहिल्यांदाच गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे या पुढील तपास करत आहेत.विविध योजनांत गुंतवणूकरॉयल टिष्ट्वंकल स्टार कंपनीने गुंतवणूकदारांसाठी विविध योजना सुरू केल्या होत्या. यामध्ये मुदत ठेव, विमा, लहान मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक आदींचा समावेश होता. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने जिल्हाभरात कमिशनबेसवर एजंटांची नेमणूक केली होती. यामध्ये हजारो जणांनी पैसे गुंतविले. गुंतविलेले पैसे परत मिळण्याची मुदत संपूनही कंपनीकडून पैसे मिळत नसल्याने गुंतवणूकदारांनी आता एजंटांच्यामागे तगादा लावला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस